ETV Bharat / bharat

Gurugram Crime : पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; आज होणार होती घटस्फोट प्रकरणावर सुनावणी - आयुष्य संपवण्याचा निर्णय

Gurugram Crime News : पोलीस निरीक्षकानं कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे आज या पोलीस निरीक्षकाच्या घटस्फोट प्रकरणावर सुनावणी होणार होती.

Gurugram Crime
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 8:29 AM IST

नवी दिल्ली : Gurugram Crime News : कौटुंबिक कलहातून पोलीस निरीक्षकानं जीवन संपवल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना गुरुग्राममधील पालम विहार इथं शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. वीरभान असं या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. विशेष म्हणजे आज त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक वीरभान यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. वीरभान यांचा पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार होती. वीरभान यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत - नवीन शर्मा, सहायक पोलीस आयुक्त गुरुग्राम

न्यायालयात सुरू आहे घटस्फोटाचा खटला : वीरभान हे रोहतक इथले राहणारे असून 2012 साली ते पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर सोहना इथल्या कायाकल्प आश्रमात योगगुरु म्हणून वीरभान हे प्रतिनियुक्तीवर होते. गुरुग्राममधील पालम विहार इथं ते भाड्याच्या घरात राहत होते. मात्र पत्नीसोबत झालेल्या वादात त्यांच्यावर कौटुंबीक हिंसाचाराचं प्रकरण दाखल झालं असून घटस्फोटाचा खटला प्रलंबित होता. बुधवारी 20 सप्टेंबरला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. आज पुन्हा त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. मात्र त्या अगोदरच त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.

वीरभान यांनी केली आत्महत्या : घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात असल्यानं पोलीस निरीक्षक वीरभान हे प्रचंड व्यथीत होते. वीरभान यांनी बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही पती दरवाजा उघडच नसल्यानं त्यांच्या पत्नीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न आल्यानं त्यांनी घरमालकाला बोलावलं. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दरवाजा तोडला असता, खोलीत वीरभान यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी वीरभान यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह वीरभान यांच्या कुटुंबीयांकडं सोपवण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Threatening Minor Girl: इस्लाम कबुल कर, नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीन मुलीस धमकावले
  2. Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.