अहमदाबाद : गुजरातमधील भाजप आमदार आशा पटेल यांना डेंग्यू झाला होता आणि त्यांच्यावर अहमदाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांचे निधन ( BJP MLA Asha Patel passes away ) झाले. आशा पटेल या महसाना जिल्ह्यातील ऊंझा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार होत्या. त्यांच्यावर जायडल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आणि त्या व्हेंटिलेटरवर होत्या.
माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली माहिती -
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ऊंझा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आशा पटेल यांचे निधन झाले आहे. हे सांगताना दुःख होतंय, असे नितीन पटेल म्हणाले. आशा पटेल यांना जायडस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डेंग्यू झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही, असे नितीन पटेल यांनी सांगितले.
आज होणार अंतसंस्कार -
आशा पटेल यांचे पार्थिव ऊंझा येथे नेण्यात आले आहे. तिथे त्यांचे पार्थिव जनतेला अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहता येत आहे. सिद्धपूर स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut On FIR In Delhi : मी भावना दुखावण्याचे बोललोच नाही -संजय राऊत