राजकोट : राजकोटच्या राजकारणात राजकोट 69 ही जागा भाजपसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. ही जागा राजकोट पश्चिम सीट (Rajkot west assembly seat) म्हणूनही ओळखली जाते. यात एकूण सहा वॉर्ड आहेत. यावेळचे राजकीय गणित पाहता भाजपने या जागेवरून महिला उमेदवाराला तिकीट दिले आहे. भाजपकडून दर्शिता शहा (Dr darshita shah) मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी या आधी राजकोटचे महापौरपदही भूषवले आहे. (Rajkot west assembly seat result).
राजकोट पश्चिम सीटचा इतिहास : या सीटबद्दल बोलायचे झाल्यास कै. अरविंद मणियार, कै चिमण शुक्ला, त्यानंतर वजुभाई वाला, विजय रुपाणी यांनी गेल्या दोन टर्ममध्ये राजकोट शहराच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम केला आहे. राजकोटमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एंट्री केली होती. त्यावेळी वजुभाईंनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा सोडली होती. या जागेवर जातीचा प्रचार करणाऱ्या पक्षाची ताकद जास्त आहे. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत या जागेवरून जो विजयी झाला आहे त्याला सरकारमध्ये मोठे पद मिळाले आहे.
राजकोट पश्चिम विधानसभा जागेचे महत्त्व : राजकोट पश्चिम विधानसभा जागेवर पाटीदार मतदारांचा प्रभाव अधिक आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. 2002 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पंतप्रधान मोदी येथून प्रथम राजकोटमधूनच आमदार झाले आणि नंतर गुजरातचे मुख्यमंत्री बनले. 2017 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही जागा राज्याच्या राजकारणात हायप्रोफाईल मानली जाते.
जेष्ठ नेते बाजूला : पाटीदारांचे वर्चस्व लक्षात घेऊन काँग्रेसने मनसुख कालरिया यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. या जागेची खास बाब म्हणजे येथील जनता जात-पात, धर्माला डावलून सत्तेत असलेल्या पक्षालाच वोट देते. सौराष्ट्रातील राजकीय चित्र पाहिल्यास एकेकाळचे बलाढ्य आणि तगडे नेते यावेळी शांत आहेत. कोणीही वरिष्ठ सत्तासंघर्षात नाही. आता लोकांचा मूड बदलला तर यावेळी या सीटवर नवे चित्र पाहायला मिळू शकते.
भाजप कडून उच्चशिक्षित उमेदवार : यावेळी भाजपने राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. दर्शिता शहा यांना तिकीट दिले आहे. डॉ. दर्शिता शहा राजकोट नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच त्या दोन वेळा राजकोटच्या उपमहापौरही राहिल्या आहेत. दर्शिता शहा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहिले असून ते पंतप्रधान मोदींच्या जवळचे होते.
काँग्रेसचा पाटीदार मतांवर डोळा : काँग्रेसचे उमेदवार मनसुख कलारिया हे पाटीदार नेते आहेत. राजकोटच्या वॉर्ड क्रमांक 10 मधून ते नगरसेवक असून ते महापालिकेत विरोधी पक्षाचे उपनेतेही राहिले आहेत. यासोबतच कालरिया यांची काँग्रेसमध्ये चिकाटीने काम करणारा नेता अशी छबी आहे. राजकोट पश्चिम विधानसभा जागेवर पाटीदार मतदारांचे वर्चस्व असल्याने काँग्रेसने येथून मनसुख कालरिया यांना तिकीट दिले आहे.
आम आदमी पक्षाकडून ब्राम्हण उमेदवार : यंदा आम आदमी पक्ष राज्यात सर्व जागांवर निवडणूक लढवत आहे. पक्षाने राजकोट पश्चिम विधानसभा जागेवरून दिनेश जोशी यांना तिकीट दिले आहे. दिनेश जोशी हे ब्राह्मो समाजाच्या गांधीग्राम क्षेत्राचे उपाध्यक्ष आहेत. तसेच ते ओंकारेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त आणि आम आदमी पक्षात सक्रिय आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाने यावेळी राजकोट पश्चिम विधानसभेसाठी दिनेश जोशी यांना तिकीट दिले आहे.
जातीय समीकरणे : राजकोट पश्चिम विधानसभा जागेवर एकूण 3.14 लाख मतदार आहेत. यात सर्वाधिक म्हणजे 72 हजार मतदार पाटीदार आहेत. त्यापैकी 38 हजार मतदार हे कडवे पाटीदार आहेत. पाटीदारांव्यतिरिक्त 44 हजार ब्राह्मण मतदार, 30 हजार वणिक समाजाचे मतदार आणि 24 हजार लोहाणा मतदार आहेत. एकूणच, राजकोट पश्चिममधील 3.14 लाख मतदारांपैकी 1.70 लाख सवर्ण मतदार निर्णायक मानले जातात. येथील अनेक सवर्ण मतदार पारंपारिकरित्या भाजपच्या बाजूने असल्याने या जागेवर भाजपची मजबूत पकड आहे. राजकोट पश्चिम विधानसभा जागेवर एकूण 353947 मतदार आहेत. यापैकी 1,79,559 पुरुष मतदार आहेत, तर 1, 74,382 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी : राजकोट पश्चिम विधानसभेच्या आठ जागांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. राजकोट शहरात मतदानादरम्यान मतदानाची गोपनीयता भंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यंत्रणेत खळबळ माजली होती. 3 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये राजकोट विधानसभेच्या 70 दक्षिण जागेवर काँग्रेसचे उमेदवार हितेश बथवार आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करताना दिसत आहे. राजकोट शहर आणि जिल्ह्यातील 8 जागांवर 51.66 टक्के मतदान झाले आहे. ज्यामध्ये राजकोट ग्रामीणमध्ये सर्वाधिक 61.42 टक्के आणि राजकोट पश्चिममध्ये सर्वात कमी 42.99 टक्के मतदान झाले.
2017 विधानसभा निवडणूक : 2017 विधानसभा निवडणुकीत, राजकोट पश्चिम विधानसभा जागा भाजपचे उमेदवार विजय रुपाणी आणि काँग्रेसचे इंद्रनील राज्यगुरु यांनी लढवली होती. इंद्रनील राज्यगुरु यांनी खास विजय रुपाणी यांचा पराभव करण्यासाठी पूर्वेकडील जागा सोडून राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीत विजय रुपाणी यांचा तब्बल 53 हजार 755 मतांनी विजयी झाला होता.