नवी दिल्ली: मार्च 2022 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 1कोटी 42 हजार 095 कोटी रुपये आहे. ज्यात केंद्रीय जीएसटी 25 हजार 830 कोटी आहे, तर राज्यांचा जीएसटी 32 हजार 378 कोटी आहे, एकात्मिक जीएसटी 74 हजार 470 कोटी आहे (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 39,131 कोटी रुपयांसह) आणि उपकर 9 हजार 417 कोटी रुपये आहे यात माल आयातीवर जमा झालेल्या 981 कोटी रुपयांचा समावेश आहे असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मार्च 2022 मध्ये सकल जीएसटी कलेक्शन ने जानेवारी 2022 महिन्यात जमा करण्यात आलेल्या 1 कोटी 40 हजार 986 कोटी रुपयांचा पूर्वीचे रेकॉर्ड मोडत सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सरकारने आयजीएसटी कडून 29 हजार 816 कोटी रुपये आणि सीजीएसटी कडून 25 हजार 032 कोटी नियमित सेटलमेंट केले आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने मार्चमध्ये केंद्र आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील 50:50 च्या प्रमाणाच्या आधारावर 20 हजार कोटी रुपयांचे आयजीएसटी सेटल केले.
मार्च 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी 65 हजार 646 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 67हजार410 कोटी रुपये आहे. केंद्राने राज्ये केंद्रशासित प्रदेशांना 18 हजार 252 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई जारी केली. मार्च 2022 चा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15 टक्के अधिक आहे. आणि मार्च 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा तो 46 टक्क्यांनी अधिक आहे.
या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 25 टक्क्यांनी जास्त होता. आणि देशांतर्गत व्यवहारातून सेवांच्या आयातीसह महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11 टक्के जास्त आहे. जानेवारी 2022 मध्ये ई-वे बिलांचा एकूण आकडा 2022 मध्ये 6.91 कोटी आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या तिमाहीत अनुक्रमे 1.10 लाख कोटी, 1.15 लाख कोटी आणि 1.30 लाख कोटींच्या तुलनेत 1.38 लाख कोटी आहे.
-
GST collection soars to all-time high of Rs 1.42 lakh crore in March
— ANI Digital (@ani_digital) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/viBcj4Fu5k#GST pic.twitter.com/r128h4zu9J
">GST collection soars to all-time high of Rs 1.42 lakh crore in March
— ANI Digital (@ani_digital) April 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/viBcj4Fu5k#GST pic.twitter.com/r128h4zu9JGST collection soars to all-time high of Rs 1.42 lakh crore in March
— ANI Digital (@ani_digital) April 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/viBcj4Fu5k#GST pic.twitter.com/r128h4zu9J
हेही वाचा : LPG price hiked : महागाईच्या झळा! एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांची वाढ