ETV Bharat / bharat

Grahan 2023 : 2023 मध्ये आहेत 4 ग्रहण, भारतात दिसणार फक्त 2, जाणून घ्या सविस्तर

author img

By

Published : Feb 11, 2023, 6:40 PM IST

वर्षे 2022 प्रमाणे 2023 मध्येही 4 ग्रहण दिसणार आहेत. यामध्ये २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. पण यापैकी फक्त 2 च ग्रहण भारतात दिसणार आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर कोणकोणते असणार ते ग्रहण.

Grahan 2023
2023 मधील भारतात दिसणारे ग्रहण

खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून ग्रहण एक महत्त्वाची घटना मानली जाते. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही म्हणजेच 2023 मध्ये 4 ग्रहण दिसणार आहेत. यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण असणार आहे. 2023 मधील पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असेल, पण ते भारतात दिसणार नाही. दुसरे म्हणजे, चंद्रग्रहण होईल. जे बुद्ध पौर्णिमेला होणार आहे आणि भारतातही दिसणार आहे.

सूर्यग्रहण : तिसरे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. हेही भारतात दिसणार नाही. वर्षातील शेवटचे आणि चौथे ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असेल जे शरद पौर्णिमेला दिसेल आणि ते भारतातही दिसणार आहे. अशाप्रकारे पाहिले तर भारतात फक्त दोन्ही चंद्रग्रहणच दिसणार आहेत. हे चारही ग्रहण कधी होणार आहेत ते बघुया. वर्षातले पहिले ग्रहण : (सूर्यग्रहण 2023) 2023 मधील पहिले ग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण असेल. पंचांगनुसार हे सूर्यग्रहण सकाळी ७.०४ ते दुपारी १२.२९ या वेळेत होईल.

दुसरे ग्रहण : (चंद्रग्रहण 2023) 2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार 5 मे 2023 रोजी होणार आहे. क्रमाने, हे वर्षातील दुसरे ग्रहण असेल. ते भारतात दिसेल, तिसरे ग्रहण : (सूर्यग्रहण 2023) 2023 सालातील हे तिसरे ग्रहण असेल. हे 2023 वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असेल, जे शनिवारी, 14 ऑक्टोबर 2023 रोजी दिसणार आहे. चौथे ग्रहण: (चंद्रग्रहण 2023) 2023 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01.06 ते 02.22 पर्यंत राहिल, हे वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे.

ग्रहणाचा सुतक काळ: हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, 2023 मध्ये होणारी दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. आणि 2023 चे दोन्ही चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे दोन्ही चंद्रग्रहणांचा सुतक कालावधी वैध असेल. 2022 मधील ग्रहण कधी होते : पहिले सूर्यग्रहण : 30 एप्रिल 2022 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसले, जे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसले.

दुसरे सूर्यग्रहण : 2022 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिसले ते भारतात तसेच जगातील अनेक देशांमध्ये दिसून आले. त्याचा प्रभाव भारतात फार अंशतः होता. पहिले चंद्रग्रहण : 2022 मध्ये पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी दिसले. हे पूर्ण चंद्रग्रहण होते. ते भारत आणि जगातील अनेक खंडांमध्ये दिसले. त्याचा प्रभाव भारतातही दिसला. दुसरे चंद्रग्रहण : 2022 मध्ये दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दिसले आणि हे देखील पूर्ण चंद्रग्रहण होते. भारतात आणि जगामध्ये आणि अनेक खंडांमध्ये दिसून आले.

हेही वाचा : Comet Near Earth 2023 : 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान घडणार हिरव्या रंगाच्या धूमकेतूचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.