ETV Bharat / bharat

सीरमला केंद्राचा दणका; ५० लाख लशींचे डोस निर्यात करण्याची नाकारली परवानगी - Luv Aggrawal

सीरमला ५० लाख लशींचे डोस निर्यात युकेला देण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे डोस देशात उपलब्ध होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या डोससाठी राज्यांनी पुण्यातील सीरमशी संपर्क साधण्याचे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे.

कोव्हिशिल्ड
कोव्हिशिल्ड
author img

By

Published : May 11, 2021, 10:49 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सीरमला ५० लाख लशींचे डोस युकेला निर्यात करण्याची परवानगी नाकारली आहे. देशभरात कोरोना लशीचा तुटवडा जात असल्याने हा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

सीरमला ५० लाख लशींचे डोस निर्यात युकेला देण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे डोस देशात उपलब्ध होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या डोससाठी राज्यांनी पुण्यातील सीरमशी संपर्क साधण्याचे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे. हे डोस १८ ते ४५ वयोगटासाठी उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी सीरमने २३ मार्चला ५० लाख कोव्हिशिल्डचे डोस युकेला निर्यात करण्याची परवानगी मागितली होती.

हेही वाचा-अटकेकरिता गेलेल्या महाराष्ट्रातील पोलिसांवर गाझियाबादमध्ये आरोपींसह कुटुंबियांचा जीवघेणा हल्ला

केंद्र सरकारची लस उत्पादकांबरोबर चर्चा

निर्यातीनंतर देशातील लसीकरण कार्यक्रम विस्कळित होणार नसल्याचेही सीरमने म्हटले होते. राज्यांना सीरमकडून थेट लस मागवू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना लसीकरणासाठी लशींचे उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारला माहित आहे. त्यासाठी केंद्र सरकार लस उत्पादकांबरोबर चर्चा करत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोना लशीचा फॉर्म्यूला सार्वजनिक करावा; अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

दरम्यान, अदर पुनावाला हे काही दिवसांपूर्वी लंडनला गेले आहेत. त्यांनी इंग्लंडमधील माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत काही श्रीमंत, अत्यंत प्रभावशाली लोकांकडून दबाव निर्माण झाल्याचा दावा केला होता. तसेच विदेशातील प्रकल्पांमधून लस उत्पादन करणार असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-बदनामीकारक दाव्याप्रकरणी राहुल कंवल यांची दिलगिरी, स्वाभिमानी संघटनेच्या जागी शिवसेनेचा उल्लेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.