नवी दिल्ली : Google नेहमी वापरकर्त्यांना नवनव्या सुविधा देऊन आश्चर्यचकित करत असते. आता सुद्धा गुगल नवी फिचर घेऊन ( Google new feature) आले आहे. जे ऑफिसेसमध्ये काम करतात.. ज्यांना वारंवार मिटींग कराव्या लागतात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनादेखील हे फिचर आवडणारे आहे. टेक जायंट नावाच फचर गुगलने बाजारात आणले आहे. ज्यानेकरून स्वयंचलितपणे व्हिडिओ फ्रेम करून ( Automatically adjust video frame ) दृश्यमानता सुधारते.
टेक जायंट : टेक जायंट ( tech giant) Google ने Meet वापरकर्त्यांसाठी स्वयंचलितपणे व्हिडिओ फ्रेम करून दृश्यमानता सुधारण्यासाठी एक नवीन वैशिष्ट्य जाहीर केले आहे. कंपनीने एका ब्लॉगपोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली. वापरकर्त्याने मीटिंगमध्ये सामील होण्यापूर्वी, Google Meet आपोआप व्हिडिओ फ्रेम ऍडजस्ट करेल असे सांगितले. म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप झूम इन करण्यासाठी Google Meet प्रत्येकजण समान रीतीने दिसावा याची खात्री करेल. हे Google मीट नवीन वैशिष्ट्य आहे.
स्वयंचलित फ्रेमिंग : या नव्या फिचरचा परिणाम कोणत्याही प्रकारे मीटिंगवर होत ( Google Meet new feature Improves visibility) नाही. उलट तयामुळे मिटींग अधिक सोप्या प्रकारे पार पडते असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. यात तुम्ही जेव्हा जेव्हा हलचाल कराल तेव्हा- तेव्हा व्हिडीओची फ्रेम तुम्हाला ऍडजस्ट करते. या वैशिष्ट्यावर कोणतेही प्रशासक नियंत्रण नाही. जर तुम्ही या फिचरला डीफॉल्ट केले तर हे काम करण्यास अक्षम होते. पण जर वापरकर्त्याद्वारे सक्षम केले तर ते काम करते. 2 नोव्हेंबरपासून नवीन फीचर सुरू होणार आहे असे कंपनीने सांगितले. Google क्लाउड नेक्स्टने हे फिचर 2022 दरम्यान प्रथम घोषित केले होते.
अनम्यूट करणे सोपे : Google ने म्हटले आहे की वापरकर्त्यांना त्यांच्या मीटिंगमध्ये काहीतरी सांगण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी त्वरीत अनम्यूट करणे सोपे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला अनम्यूट केल्यानंतर पुन्हा म्यूट करायला विसरता तेव्हा हे वैशिष्ट्य मदत करते कंपनीने म्हटले आहे. हे वैशिष्ट्य बाय डीफॉल्ट बंद असते आणि ते Google Meet सेटिंग्जमध्ये सुरू केले जाऊ शकते.