जौनपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील मच्छली शहर येथे घरातील शौचालयाचे सेफ्टी टंक साफ करत असताना कुटुंबीयांना आणि मजुरांना सोन्याची नाणी ( British Era Gold Coins Found ) सापडले होते. त्यांनी ही बाब कोणालाही कळू दिली नाही. शनिवारी, 16 जुलै रोजी पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी नाणी ताब्यात घेतली आहेत. सर्व नाणी ब्रिटिश राजवट 1889-1912 मधील सांगितली जात आहेत. पोलीस कामगारांची चौकशी करत आहेत. काही मजूर फरार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छली शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँ पत्नी इमाम अली रैनी यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी मंगळवारी खड्डा खोदला जात होता. उत्खननादरम्यान तांब्याच्या भांड्यात काही नाणी सापडल्याची चर्चा आहे, यावरून कामगार आपापसात भांडू लागले. कुटुंबाच्या मते कामगारांनी काम अर्धवट सोडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मजूर आले आणि नाण्यांच्या लोभापायी खोदकाम करू लागले. याचदरम्यान एका मजुराने राईन यांच्या मुलाला सोन्याची नाणी मिळाल्याचे सांगितले.
कसून चौकशी करताच दिली कबुली - राईन यांच्या मुलाने काम करणाऱ्या मजुरांकडून नाणे मागायला सुरुवात केली असता मजुरांनी त्याला नाणे दिले. बुधवारी सायंकाळपर्यंत घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. प्रभारी निरीक्षकांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी कामगारांची चौकशी केली. कामगारांनी प्रथम असे काहीही आम्हाला आढळले नाही असे सांगितले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी सोन्याची नाणी मिळाल्याचे खरे सांगितले.
10 नाणी सापडली - मजुरांनी 9 सोन्याची नाणी पोलिसांना दिली आणि एक नाणे घरमालकाने दिले. एकूण 10 नाणी पोलिसांनी ताब्यात घेतली. तांब्याच्या लॉटमध्ये किती नाणी होती? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस मजुरांची चौकशी करत आहेत. मच्छली शहर ऑफिसर अतर सिंग यांनी सांगितले की, मी घटनास्थळी गेलो होतो. एकूण 10 नाणी मिळाल्याचे मजुरांनी सांगितले. सर्व नाणी सरकारी तिजोरीत जमा झाली आहेत. कामगारांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; आठ जणांची ओळख पटली