गोवा (पणजी) - पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर गोव्याची ओळख आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील संस्कृती भुरळ घालते. येथील संगीत, नृत्य, गाणी ही येथील संस्कृतीची मूलभूत अंगे आहेत. येथील नृत्य, नृत्यांगना यांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या गोवन बँडची ही वेगळी ओळख आहे.
काय आहे गोवन बँड? (Goan Band)
सेक्साफोन, ड्रम पॅड व ढोलच्या साहाय्याने साधारण 10 ते 15 लोक एक विशिष्ट सूर लावून ही वाद्य वाजवीत असतात. लयबद्ध पध्दतीने वाजवल्या जाणाऱ्या शब्दसुरांच्या आवाजामुळे एक सुमधुर धून तयार होते. विशेषतः लग्न सोहळे, मान्यवरांचे स्वागत, तसेच मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोवन बँड वाजवला जातो. गोवन बँड वाजवणाऱ्या कलाकारांचे कपडेही गोव्याच्या नैसर्गिक रंगाप्रमाणे रंगीबेरंगी असतात. रंगीबेरंगी शर्ट आणि पॅन्ट तसेच डोक्यावर काळी टोपी हा मुख्य पोशाख असतो या बँड वाजवणाऱ्या वक्तींचा.
बँड ही गोव्यातील सांस्कृतिक ओळख
गोव्याच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वाद्य वाजविली जातात. मात्र, गोवन बँड हा गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच बाहेरून येणाऱ्या लोकांना हे संगीत कानावर पडल्यावर आनंद होत असल्याचे बँड कलाकार टोनी परेरा यांनी सांगीतले आहे. दरम्यान, गोवन बँड ही गोव्याची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले.
ख्रिश्चन धर्मात गोवन बँड ला आहे मोठे महत्व
ख्रिश्चन धर्मातील अनेक परंपरा या गोवन बँडशी जोडल्या गेल्या आहेत. लग्नसोहळा किंवा प्रेतयात्रा यांच्यातही ख्रिश्चन धर्मीय हा बँड वापरत असतात. पार्ट्यांची रंगत वाढवण्यासाठी या बँड ना खास आमंत्रण असते. या बँडच्या तालावर गायिका गाणे सादर करून कार्यक्रमाची लज्जत वाढवीत असतात.
हेही वाचा - नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपा युवा मोर्चाचे मंत्रालयासमोर आंदोलन