ETV Bharat / bharat

नियमांचे पालन करत कोविड काळातही पर्यटन चालूच राहणार, गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

कोरोना काळात पर्यटनबंद करावे लागल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक उद्योग व्यवसायिकांना आणि पर्यटन व्यवसायास कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. राज्यात मुख्यमंत्री सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे कोविडच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसण्यासाठी भविष्यात कोविड काळातही पर्यटन सुरू ठेवावे लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले

गोव्याच्या आरोग्य मंत्र्याचे स्पष्टीकरण
गोव्याच्या आरोग्य मंत्र्याचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Sep 26, 2021, 7:56 AM IST

Updated : Sep 26, 2021, 9:45 AM IST

पणजी- राज्यात सध्या ५० टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले असून राज्यातील पर्यटन सुरू झाले आहे. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नाही. ज्याप्रमाणे कोविड काळात जगाचे अर्थचक्र सुरू झाले त्याप्रमाणेच राज्यातील अर्थव्यवस्था सुरुळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
कोविड काळातही पर्यटन सुरू राहणार- आरोग्यमंत्री

कोरोना काळात पर्यटनबंद करावे लागल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक उद्योग व्यवसायिकांना आणि पर्यटन व्यवसायास कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. राज्यात मुख्यमंत्री सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे कोविडच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसण्यासाठी भविष्यात कोविड काळातही पर्यटन सुरूच ठेवावे लागणार आहे. त्यादृष्टीने कोरोना नियमांचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील तसेच, राज्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविडचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

सिनियर राणेंच्या फडणवीस भेटीवर , नो कॉमेंट्स

राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच प्रतापसिंह राणे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती विषयी चर्चा झाली होती, याबद्द्ल विश्वजीत राणे यांना विचारले असता, त्यांनी याबाबत नो कॉमेट्स म्हणत भाष्य करण्याचे टाळले.

राणे लढविणार निवडणूक?

विश्वजीत राणे आपल्या पारंपरिक वाळपय मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरवायचे आहे, मात्र वडील प्रतापसिंह राणे त्यांच्या पारंपरिक पर्यें मतदारसंघातून राज्याचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली होती. त्यावेळी त्यांनी आपण भविष्यात निवडणूक लढविणार नसल्याचे सूतोवाच केले होते. मात्र त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे भविष्यात सिनियर राणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर त्यांनी निवडणूक लढवायचे टाळले तर राणे कुटुंबातून प्रतापसिंह राणे यांची सून म्हणजेच विश्वजीत राणे यांच्या पत्नी निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतात.

Last Updated : Sep 26, 2021, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.