ETV Bharat / bharat

Goa Assembly Congress List : निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर

author img

By

Published : Dec 16, 2021, 9:02 PM IST

काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक ( Mukul vasnik ) यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. तलिगावमधून टोनी रोड्रिग्स, पोंडा येथून राजेश वेरेनकर, मर्मुगावमधून संकल्प अमोनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कर्टोरिम येथून एलिक्सो रेजिनाल्डो लारेन्सो ( Aleixo Reginaldo Lourenco from the Curtorim seat) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मुकुल वासनिक
मुकुल वासनिक

पणजी- गोवा काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर करणारा काँग्रेस पहिला पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकणार आहे.

काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. तलिगावमधून टोनी रोड्रिग्स, पोंडा येथून राजेश वेरेनकर, मर्मुगावमधून संकल्प अमोनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कर्टोरिम येथून एलिक्सो रेजिनाल्डो लारेन्सो ( Aleixo Reginaldo Lourenco from the Curtorim seat) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर
काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : शिवसेनेने साथ दिल्यास गोवा विधानसभा निवडणुकीत युती - पी. चिदंबरम

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही तिकीट

काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी 2012 ते 2017 दरम्यान मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते गोवा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मरगावमधून दिगंबर कामत ( Digamber Kamat from the Margao constituency ) आणि कुनकोलिममधून यूरी अलीवामो ( Sudhir Kanolkar from the Mapusa assembly seat ) हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मापुसा विधानसभा क्षेत्राचे सुधीर कानोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आमदार चर्चिल आलेमाव तृणमूलमध्ये

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून यादी निश्चित

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केल्या नाहीत. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक कार्यक्रम होईल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा-Goa Cong MLA Ravi Naik resigns : रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.