भोजपूर (बिहार) : बिहारच्या भोजपूरमध्ये रॅपिड फायरिंगमध्ये एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेलाई गावात रात्री उशिरा सशस्त्र गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर चोरट्यांनी घरात घुसून मुलीला तिच्या वडिलांचा पत्ता विचारला असता तीने नकार दिला. त्या रागातून त्याने मुलीवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेहासह परिस्थितीची पाहणी केली.
हेही वाचा : Tejashwi Yadav : झुकणे सोपे! मात्र, आम्ही लढण्याचा निर्णय घेतलाय; बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
पत्ता सांगण्यास नकार दिल्याने गोळ्या झाडल्या : भोजपूरमध्ये काल रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील लोक रात्रीचे जेवण करून झोपायला जात होते, असे सांगितले जाते. 8 वर्षांची मुलगी आराध्या तिचा गृहपाठ करत होती. दार ठोठावल्याचा आवाज ऐकून मुलीने दरवाजा उघडले, तेव्हा कृष्ण सिंह कुठे आहे, अशी विचारणा चोरट्यांनी केली. मुलगी म्हणाली, माहीत नाही. त्या दरम्यान, चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरातील बाकीच्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, हल्लेखोरांनी आपली शस्त्रे काढून तरुणीवर गोळ्या झाडल्या. आणि तेथून पळ काढला. या गोळीबाराच्या घटनेने भोजपूर हादरले आहे. यावेळी जागेवर त्या मुलीचा मृत्यू झाला. निष्पाप मुलीचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
जमिनीच्या वादातून भावाची हत्या : रोहतासच्या दिनारा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंड गावातील रहिवासी असलेल्या कृष्ण सिंहचा त्याच्या गावातील काही लोकांशी जमिनीचा वाद सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 25 एकर जमिनीचा वाद आहे. या वादातून यापूर्वीही गोळीबार झाला आहे. पहिल्या गोळीबारात कृष्ण सिंह आणि त्याच्या भावावरही चार वर्षांपूर्वी गोळीबार झाला होता. ज्यात कृष्ण सिंहचा भाऊ मारला गेला. यासोबतच कृष्णा सिंह यांनाही गोळ्या लागल्या होत्या.
हेही वाचा : Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द; प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान