मोतिहारी : दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोतीहारीमधील आहे. चार तरुणांनी दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती मिळताच रक्सौल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडितेने ताब्यात घेतलेल्या चार तरुणांना ओळखले आहे.
रक्सौल पोलीस स्टेशन हद्दीतील सैनिक रोडवरून दिव्यांग महिला जात होती. चार तरुणांनी महिलेला पकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या चिकन सेंटरमध्ये नेले. यानंतर चार तरुणांनी पीडितेला मारहाणही करत तोंडाला काळे फासले. पीडितेच्या चेहऱ्यावर तसेच शरीरावर जखमेच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. जखमी अवस्थेत घाबरलेल्या महिलेने घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी रक्सौल पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
कठोर कारवाई केली जाणार-पोलीस अधीक्षक गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी रामगढवा पोलीस स्टेशन परिसरातील चिकन सेंटरचे संचालक चडवा बेल्हिया याला अटक केली. अरमान, त्याचा कर्मचारी मोहम्मद, नेपाळच्या एकबाल आणि नुरुल होडा अशी अटक करण्यात आल्याची नावे आहेत. पोलीस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, महिलेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेतील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा सखोल पद्धतीने तपास करण्यात येत आहे. या घटनेनंतर गावातील लोकांमध्ये संताप वाढला आहे. दिव्यांग महिलेसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षक मिश्रा यांनी सांगितले.
बिहारचा देशात गुन्हेगारीमध्ये पहिला क्रमांक बिहारमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. पूर्णियामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. 10 वर्षीय मुलगी गावात खेळत असताना आरोपीने तिला बळजबरीने जवळच्या शेतात नेऊन बलात्कार केला. यानंतर त्याने क्रूरपणे तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये माती टाकली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले. लोक येत असल्याचे पाहून आरोपी फरार झाला.