मुंबई/हैदराबाद : हैदराबादच्या नार्कोटिक एन्फोर्समेंट विंगने मुंबईमध्ये मुलींला अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीला पकडले आहे. जतीन बालचंद्र भालेराव (३६), जावेद समशेर अली सिद्दीकी (३४), जुनैद शेख शमशुद्दीन (२८) आणि विकास मोहनकुमार उर्फ विकी (२८) यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 204 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. शहराचे सीपी सीव्ही आनंद यांनी मंगळवारी बंजारा हिल्स पोलिस कमांड कंट्रोल सेंटरमध्ये नार्कोटिक एन्फोर्समेंट विंगचे डीसीपी गुम्मी चक्रवर्ती यांच्यासह हे तपशील उघड केले.
अशाप्रकारे चालायचे काम : विमा एजंट असल्याचा दावा करणारा जतिन मुंबईतील सिंथेटिक औषध विक्रेत्यांकडून प्रतिबंधित एमडीएमए 10 लाख रुपये प्रति किलोने विकत घ्यायचा. त्यानंतर त्याचे 5 आणि 10 ग्रॅममध्ये रूपांतर करायचा आणि बाहेरच्या बाजारात 20 लाख रुपयांना विकायचा. दुसरा आरोपी जावेद पार्ट्यांचे आयोजन करून मुलींना एमडीएमए ड्रग्स द्यायचा. त्यानंतर ते त्यांच्यावर दारूच्या नशेत लैंगिक अत्याचार करायचे. पोलिसांनी जतीनच्या 81 आणि जावेदच्या 30 ग्राहक तरुणींची ओळख पटवली आहे. याच भागातील विकासचा भाऊ दिनेश आणि जुनेद शेख शमशुद्दीन हे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोचवायचे.
सत्य असे उघड झाले : सना खान (34) ही मुंबईतील महिला एका आयटी कंपनीत नोकरीच्या निमित्ताने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोंडापूरला आली होती. अमली पदार्थाची सवय असल्याने ती एमडीएमएसाठी वीकेंडला मुंबईला जात असे. ती 10-20 ग्रॅम 100 रुपये प्रति ग्रॅम दराने खरेदी करायची आणि शहरातील तरुणींना 2,000 रुपये प्रति ग्रॅमने विकायची. गेल्या महिन्याच्या ९ तारखेला ती मुंबईहून रेल्वेने 12 ग्रॅम एमडीएमए घेऊन येत असताना गोपालपुरम पोलिसांनी तिला हैदराबादच्या सिकंदराबाद स्टेशनवर अटक केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डिकॉय ऑपरेशनद्वारे ग्राहक असल्याचे भासविणाऱ्या चार आरोपींना अटक केली. आणखी एक आरोपी दिनेश याला मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. शहरातील 20 तरुणी सना खान हिच्याकडून ड्रग्ज खरेदी करत असल्याची माहिती आहे.
साताऱ्यात मद्यसाठा जप्त : साताऱ्यात नुडल्स वाहतुकीच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार्या ट्रकवर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत 60 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर मालखेड (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नूडल्स वाहतुकीची पावती दाखवून दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.