ETV Bharat / bharat

Amritpal Singh arrested: अखेर अमृतपाल सिंग ३६ दिवसानंतर पोलिसांना आला शरण; आसामच्या तुरुंगात होणार रवानगी

author img

By

Published : Apr 23, 2023, 7:27 AM IST

Updated : Apr 23, 2023, 10:44 AM IST

पंजाब पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेला थकून खलिस्तानवादी अमृतपाल सिंग पोलिसांना शरण आला आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्याच्या पत्नीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृतपाल सिंग अटक
Amrit Pal arrest

अमृतसर- खलिस्तानवादी अमृतपाल सिंग हा मोगा पोलिसांना रोडेवाल गुरुद्वारमध्ये शरण आला आहे. अंजनवाला येथे हिंसाचार केल्यानंतर तो फरार झाला होता. गेली ३६ दिवस तो पोलिसांना तो चकवा देत होता. त्याने पोलिसांना स्वत:हून गुरुद्वारामध्ये आल्याची माहिती दिली.अटकेतील अमृतपाल सिंगला अमृतसर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची आसामच्या डिब्रुगडमध्ये रवानगी करण्यात येणार असल्याचे सुत्राने सांगितले आहे.

  • #AmritpalSingh arrested in Moga, Punjab.

    Further details will be shared by #PunjabPolice

    Urge citizens to maintain peace and harmony, Don't share any fake news, always verify and share.

    — Punjab Police India (@PunjabPoliceInd) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाब सरकारच्या खलिस्तानविरोधी कारवाईचे कौतुक केले होते. तसेच पंजाबमध्ये कोणतीही खलिस्तानवादी चळवळ नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमृतपाल सिंग हा पोलिसांना शरण आला आहे. अमृतपालच्या अटकेनंतर त्याचे समर्थक आक्रमक होऊ शकतात. हे लक्षात घेऊन पंजाब पोलिसांनी ट्विट केले आहे. पंजाब पोलिसांनी ट्विट करत म्हटले, नागरिकांनो शांतता व सौहार्द राखा. कोणत्याही बातमीची खात्री केल्याशिवाय शेअर करू नका.

नुकतेच पत्नीला करण्यात आली आहे अटक- अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर ही लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, पंजाब पोलिसांनी अमृतसर येथील श्री गुरु राम दास आंतरराष्ट्रीय विमानतळवरावरून ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर अमृतपाल सिंग हा लवकरच पोलिसांना शरण येईल, असा पोलिसांना अंदाज होता आहे. यापूर्वी तो शरण येईल अशी चर्चा होती. मात्र, त्याने आपण शरण येणार नाही, असे सांगत युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला होता. किरणदीप कौर ही अनिवासी भारतीय असून देशात १८० दिवस राहू शकते, असा तिने पोलिसांकडे दावा केला होता. पंजाब पोलिसांनी यापूर्वी अमृतपाल सिंगच्या जवळच्या सहकाऱ्यांनादेखील अटक केली आहे. गुरजंट सिंग आणि निशा राणी अशी या आरोपींची नावे आहेत.

काय आहे अजनाला प्रकरण?'वारीस पंजाब दा'चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये अमृतसरमधील अजनाला पोलीस स्टेशनच्या बाहेर तलवारी आणि बंदुकांसह हल्ला करत पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा समर्थक सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ जमावाने मोठा गोंधळ घातला होता. आक्रमक झालेल्या जमावाच्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाल्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशनचा ताबाच घेतला होता. चमकौर साहिब रहिवाशी वरिंदर सिंग यांनी अमृतपाल आणि त्याच्या समर्थकावर अपहरण व मारहाण केल्याची तक्रार केली होती. अमृतपाल सिंगने हे आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा-Kirandeep Kaur Detained : खलिस्तानवादी अमृतपाल सिंगची बायको पोलिसांच्या ताब्यात, लंडनला चालली होती पळून

Last Updated : Apr 23, 2023, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.