ETV Bharat / bharat

Hyderabad Murder Case : मित्राच्या गर्लफ्रेंडवर करायचा प्रेम अन् मित्रानेच केला त्याचा गेम; मृतदेहासोबत घेतला सेल्फी - Friend Murder Case Hyderabad

जिवलग मित्र आपल्याच गर्लफ्रेंडवर प्रेम करतो. या गोष्टीचा राग मनात धरून एका युवकाने मित्राची अमानूष हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आपल्या मित्राला गेट टुगेदर पार्टीचा बहाना करून बोलावले आणि संधी मिळताच मित्राचा खून केला. हैदराबादमधील अब्दुल्लापूरमेट या उपनगरात रविवारी ही घटना उघडकीस आली.

Friend Murder Case Hyderabad
हत्याकांड
author img

By

Published : Feb 26, 2023, 9:39 PM IST

Updated : Feb 26, 2023, 9:58 PM IST

हैदराबाद (तेलंगाना): नागरकुरनूल जिल्ह्यातील चारुकोंडा मंडलातील वंकराई तांडा येथे राहणारा नेनावत नवीन (२०) हा नालगोंडा येथील महात्मा गांधी विद्यापीठात बी.टेकच्या (ईईई) शेवटच्या वर्षाला शिकत आहे. पेरला हरिहरकृष्ण हा वारंगल जिल्ह्यातील करीमाबाद येथील रहिवासी आहेत. तो हैदराबादमधील पिरजादीगुडा येथील अरोरा कॉलेजमध्ये बी.टेकचे शिक्षण घेत आहे. दिलसुखनगर आयडियल कॉलेजमध्ये इंटरचे शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री जमली.

यामुळे रचला हत्येचा कट: नवीनला एक गर्लफ्रेंड होती. हरिहरकृष्णाला हे माहीत होते. दोन वर्षांपूर्वी नवीन आणि त्या मुलीचे भांडण झाले होते. हे पाहून हरिहरकृष्ण प्रेमाच्या नावाने तिच्या जवळ गेला. यानंतर, नवीन त्याच्या पूर्व प्रेयसीशी फोनवर बोलत बोलत असल्याचे हरिहरकृष्णला कळले. यामुळे तो रागावला. आपल्या आवडत्या मुलीला मिळवण्यासाठी त्याने नवीनची हत्या करण्याचा कट रचला. याकरिती त्याने एक चाकूही विकत घेतला. तो नवीनला जीवे मारण्याच्या संधीची वाट पाहत होता. त्याने नवीनला फोन केला आणि महिन्याच्या १७ तारखेला मित्रांचे गेट-टूगेदर आहे असे सांगितले. यासाठी तो त्याला हैदराबादला घेऊन आला.

दोघांनीही प्यायली दारू: नवीन हैदराबादला आला आणि एलबी नगरमध्ये हरिहर कृष्णाला भेटला. दोघेही काही वेळ शहरात फिरले. सायंकाळ झाल्याने नवीनने वसतिगृहात जाण्याची इच्छा दर्शविली. मात्र, हरिहरकृष्णने त्याला नकार दिला. यानंतर तो नवीनला घेऊन हयातनगरमध्ये आला. येथे हरिहरकृष्णने दारू विकत घेतली आणि पेड्डा अंबरपेठ आऊटर रिंग रोड ओलांडल्यानंतर दोघेही निर्जन भागात गेले आणि दोघांनी दारू प्यायली.

हाणामारी आणि खून: मध्यरात्रीनंतर हरिहरकृष्णने मुलीचा उल्लेख करून नवीनसोबत भांडण उकरून काढले. दोघांमध्ये हाणामारी झाली आणि त्याने नवीनचा खून केला. तो उठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर हरिहरकृष्णने नवीनच्या मृतदेहाची विटंबनासुद्धा केली. हैदराबादला गेट-टूगेदरसाठी गेलेला नवीन रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्याच्या खोलीतील मित्रांनी नवीनला रात्री 8.20 वाजता फोन केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. मध्यरात्रीनंतरही नवीन न आल्याने मित्रांनी पुन्हा फोन केला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता. मित्रांनी नवीनच्या गर्लफ्रेंडशी संपर्क साधल्यानंतर तिने हरिहरकृष्णाचा नंबर दिला. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री त्याने नवीनला अब्दुल्लापूरमेटजवळ सोडले.

अखेर आरोपीचे आत्मसमर्पण: नवीनचे वडील शंकर आणि काकांना घटनेची माहिती कळताच 21 तारखेला नवीनचे वडील आणि काका अब्दुल्लापूरमेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हरिहरकृष्णला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता. पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी नवीनच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि नरकटपल्ली पोलिस स्टेशनमध्ये २२ तारखेला तक्रार दाखल केली. त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासाच्या प्रक्रियेत पोलिसांनी हरिहरकृष्णाची चौकशी केली. त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी आपला मुलगा दोन दिवसांपासून दिसत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. या महिन्याच्या 21 तारखेपासून घरी न आल्याची तक्रार त्याच्या मेहुण्याने 23 तारखेला मलकपेठ पोलिसांकडे केली होती. या आधारे तपास केला असता, घाबरलेला हरिहरकृष्णने शुक्रवारी अब्दुल्लापूरमेट पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

हत्येनंतर शरीराची विटंबना: हरिहरकृष्णची चौकशी केली असता नवीनचा मृतदेह पेडम्बरपेट अंतर्गत निर्जन भागात सापडला. घटनास्थळी नवीनच्या शरीराची विटंबना केली होती. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हरिहरकृष्णचा फोन जप्त केला आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde : बरं झालं विरोधक चहापानाला आले नाहीत, नाहीतर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लागला असता - मुख्यमंत्री शिंदे

Last Updated : Feb 26, 2023, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.