ETV Bharat / bharat

FIFA World Cup 2022 : अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समध्ये गोंधळ, चाहत्यांनी जाळली वाहने - भीषण हिंसाचार

फिफा विश्वचषकाच्या ( FIFA World Cup 2022 ) अंतिम फेरीनंतर पॅरिस, फ्रान्ससह अनेक शहरांमध्ये दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सला अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर चाहते अक्रमक झाले. पोलिसांना याठिकाणी जोरदार कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. ( French Police Use Tear Gas Against Fans )

French Police
फ्रेंच पोलिस
author img

By

Published : Dec 19, 2022, 12:18 PM IST

पॅरिस : अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक २०२२ ( FIFA World Cup 2022 ) चे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समधील चाहत्यांचा संयम सुटला असून देशाच्या विविध भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाहनांची तोडफोड : अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.फिफा विश्वचषक फायनलसाठी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. येथे मोठ्या पडद्यावर विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला जात होता, दरम्यान सामन्याचे वातावरण तापत असताना चाहत्यांचे ठोकेही वाढले.

पोलीस तैनात : मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरे जावे लागताच परिस्थिती अनियंत्रित झाली आणि विविध शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. पॅरिसशिवाय लायनमध्येही पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इथेही चाहत्यांनी वाहने पेटवली.फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ आणि चित्रे समोर आली आहेत, ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. कारण लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते.

अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव : फिफा विश्वचषक फायनलबद्दल बोलायचे झाले तर कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली तेव्हा स्कोअर 3-3 होता, फ्रान्ससाठी या सामन्यात एमबाप्पेने हॅट्ट्रिक केली तर लिओनेल मेस्सीने दोन गोल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.