ETV Bharat / bharat

Amreli MLA Heera Solanki : समुद्रात बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी धावले आमदार, तिघांना वाचवण्यात यश तर चार तरुणांचा मृत्यू - हीरा सोलंकी यांनी थेट समुद्रात उडी

गुजरातमध्ये चक्क आमदार समुद्रात बुडणाऱ्या नागरिकांच्या मदतीला आल्याचे दृष्य नुकतेच पाहायला मिळाले. अमरेलीतील राजुला समुद्रात चार तरुण बुडत होते. त्यावेळी आमदार हीरा सोलंकी बचाव पथकात सामील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Amreli MLA Heera Solanki
Amreli MLA Heera Solanki
author img

By

Published : Jun 1, 2023, 7:29 PM IST

अमरेली (गुजरात) - लोकप्रतिनिधी लोकांच्या थेट मदतीला येतात अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. गुजरातमध्ये नुकतेच असे एक उदाहरण समोर आले आहे. अमरेलीतील राजुला समुद्रात सुट्टी असल्याने तरुणांची गर्दी वाढली आहे. मौज-मजा करण्यासाठी तरुण बीचवर येताना दिसत आहेत. हे चित्र सर्वच समुद्र किनाऱ्यांवर आता पाहायला मिळत आहे. यामध्ये बुडण्याचे प्रमाणही या दिवसात वाढते. राजूला येथील किनाऱ्यावर असाच प्रकार घडला. यात चार तरुण बुडाले. मात्र तीन तरुणांना वाचवण्यात यश आले. यातील बचाव कार्यात चक्क आमदार हीरा सोलंकी यांनी थेट समुद्रात उडी घेऊन बचाव पथकाला मदत केली.

अमरेली येथील राजुला येथील समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ज्यामध्ये स्थानिक लोकांनी तिघांना वाचवण्यात यश आले. यावेळी राजुलाचे आमदार हीरा सोळंकी यांनीही स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतली. त्यांनी मदतकार्यात हातभार लावला.

समुद्रावर काहीतरी गडबड झाल्याची माहिती आमदारांना कळली. त्यावेळी राजुल्याचे आमदार घटनास्थळी पोहोचले. हीरा सोलंकी आणि पोहणाऱ्यांचे पथक तीन तरुणांना वाचवण्यासाठी आणि एका तरुणाचा शोध घेण्यासाठी समुद्रात गेले. आमदार हीरा सोळंकी यांचा जीव धोक्यात घालून विजेचा शॉक लागूनही समुद्रात युवकांचा शोध घेतला. आमदारांनी समुद्रात उडी घेतल्यावर अनेक तरुणही त्यांच्यासोबत आले.

पटवा गावच्या समुद्रात झालेल्या अपघाताचे वृत्त समजताच राजुल्याचे आमदार हीरा सोळंकी यांनी समुद्र गाठला. आजूबाजूच्या गावातील लोकही समुद्रकिनाऱ्यावर आले आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पोहणाऱ्यांनी समुद्रात उड्या मारल्या. यावेळी आमदार हीरा सोळंकी यांनीही इतर जलतरणपटूंसोबत समुद्रात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोन तासांच्या शोधानंतर बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला.

जीवन गुजरिया, कल्पेश शियाळ, विजय गुजरिया आणि निकुल गुजरिया हे राजुला येथील पटवा गावाजवळील समुद्रकिनारी अंघोळ करण्यासाठी गेले होते. समुद्रात वेगवान लाटा असल्याने चारही तरुण बुडायला लागले आणि आरडाओरडा करू लागले. त्यामुळे स्थानिक लोकांनी समुद्रात उडी मारून तिघांना वाचवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.