ETV Bharat / bharat

Car Accident Karimnagar : भरधाव कार झोपडीवर आदळल्याने चार महिलांचा मृत्यू - झोपडीवर कार कोसळल्याने चार महिलांचा मृत्यू

करीमनगर ( Karimnagar Car accident ) येथे रविवारी एका झोपडीवर वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने चार महिला ( Four Women Died Car accident ) ठार झाले आहेत. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

कार अपघात
कार अपघात
author img

By

Published : Jan 30, 2022, 3:10 PM IST

Updated : Jan 30, 2022, 3:18 PM IST

हैदराबाद - तेलंगाणातील करीमनगर जिल्ह्यात ( Karimnagar District in Telangana ) रविवारी (आज) सकाळी एका झोपडीवर भरधाव कार आदळल्याने चार महिलांचा मृत्यू झाला ( Four Women Died Car accident ) आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळावरील व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजता करीमनगर येथील कामन परिसरात कार झोपडीवर आदळून चार महिलांचा मृत्यू झाला. या महिला घराबाहेर काम करत असताना अचानक एक ओव्हरस्पीड कार त्यांच्या झोपडीत घुसली आणि त्यांना चिरडले. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जखमी महिलांना तातडीने करीमनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरियाद, ज्योती, सुनिता आणि ललिता अशी मृत महिलांची नावे आहेत.

आरोपी गाडी मागे सोडून फरार झाला आहे. काचकायला राजेंद्र प्रसाद व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत वाहन पोलिसांना सापडले आहे. या कारवर विविध भागात नऊ ओव्हरस्पीडिंग चालनाबाबतही पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Clerk Fraud in School : विद्यार्थ्यांच्या फीचे 14 लाख लाटणाऱ्या मुंबईतील लिपीक महिलेला अटक

Last Updated : Jan 30, 2022, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.