पाटणा : बिहारच्या गयामध्ये होलिका दहनाच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली. रविवारी सायंकाळी होळीचा उत्सव सुरू असताना आग लागून तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही एकाच कुटुंबातील होते.
होलिका दहन सुरू असताना लोक होळीमध्ये लाकडे फेकत होते. यातील एक पेटते लाकूड शेजारच्या गवताच्या गंजीवर पडल्यामुळे मोठी आग लागली. चार लहान मुलं या आगीच्या कचाट्यात सापडली होती. यांपैकी तिघांचा जागीच अंत झाला, तर एकाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहित कुमार (१२), नंदलाल मांझी (१३), पिंटू मांझी (१२) आणि रितेश कुमार (१२) अशी या चौघांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कित्येक राज्यांनी होळी, धूलिवंदन असे सण साजरा करण्यावर निर्बंध घालते आहेत.
हेही वाचा : पालघर; होळीच्या दिवशीच झाली संसाराची राख रांगोळी; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू