(बिहार) उत्तर प्रदेश : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी याबाबतची माहिती दिली. रात्री 11 वाजता फेसबूकवर ‘पापा नहीं रहे’ असे म्हटले. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते.
मुलीची फेसबुक पोस्ट : शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकद्वारे वडील शरद यादव यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘पापा नहीं रहे’ असे हिंदीतून लिहिले आहे. त्यापुढे त्यांनी भावनीक इमोजीही वापरले. शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला होता. आधी जबलपूरनंतर मधेपुरा आणि नंतर बदायूं येथून लोकसभेचे सदस्य झाले.
शरद यादव यांचा राजकीय प्रवास : 1974 मध्ये जबलपूरमधून पहिल्यांदा पाचव्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर सुमारे 50 वर्षे सार्वजनिक जीवनात काम करून ते सात वेळा लोकसभेचे खासदार आणि चार वेळा राज्यसभेचे खासदार होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ७० च्या दशकात चळवळीतून शरद यादव यांनी भारतीय राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यांनी जनता दलापासून फारकत घेत १९९७मध्ये जनता दल (युनायटेड) ची स्थापना केली. 2003 ते 2016 या काळात यादव जेडीयूचे प्रमुख राहिले. २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शरद यादव यांनी जेडीयूवरील आपला दावा गमावला.
पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका : लोकसभा निवडणुकीत शरद यादव यांचा पराभव झाला. नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यावर पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले. २०१८ मध्ये, जेडी (यू) पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एलजेडीमध्ये प्रवेश केला होता. आणीबाणीच्या काळात वादग्रस्त मेन्टेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट (MISA) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. 1999 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार होता. 2001 मध्ये केंद्रीय श्रम मंत्री म्हणून काम पाहिलेय. 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून संसदेत गेले. गृह मंत्रालयाशिवाय इतर अनेक कमिटींमध्ये ते सदस्य होते. 2009 मध्ये शरद यादव सातव्यांना खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 लोकसभा निवडणुकीत शरद यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा : IED Blast in Chaibasa : चाईबासा येथे सलग दुसऱ्या दिवशी आयईडीचा स्फोट, तीन जवान जखमी