लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan addresses) यांनी आपल्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर शुक्रवारी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर हल्ला होणार असल्याचे मला एक दिवस आधीच कळले होते. पण जनतेने मला प्रोत्साहन दिले. खान यांनी सांगितले की, या हल्ल्यात (Imran Khan Attack) त्यांच्या उजव्या पायाला चार गोळ्या लागल्या आहेत. इम्रान खान यांनी लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयातून व्हीलचेअरवर बसून देशाला संबोधित केले. इम्रान खान यांच्या रॅलीवर 3 नोव्हेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
हल्ला होणार हे मला माहिती होते - इम्रान खान पुढे म्हणाले की, मी हल्ल्याबद्दल नंतर तपशीलवार बोलेन." मला वजिराबाद (पंजाब प्रांतात) किंवा गुजरातमध्ये ठार मारण्याची योजना होती हे मला हल्ल्याच्या एक दिवस आधीच समजले होते. मला चार गोळ्या लागल्या होत्या. पुढे ते म्हणाले, बंद दारात चार जणांनी माझी हत्या करण्याचा कट रचला होता. माझ्याकडे एक व्हिडिओ देखील आहे, मला काही झाले तर तो व्हिडिओ रिलीज केला जाईल, असेही खान यावेळी म्हणाले.
इम्रान खान गोळीबारात झाले होते जखमी - वजिराबाद येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर 3 नोव्हेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. इम्रान खान या हल्ल्यात जखमी झाले होते. वजिराबाद हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे १०० किलोमीटरवर चिनाब नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. येथेच खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
आझादी मार्च - इम्रान खान सध्या पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मोर्चा काढत आहेत. ते सध्याच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तोषखाना प्रकरणात इम्रान दोषी आढळल्यापासून त्याच्यावतीने आझादी मार्च सुरू करण्यात आला आहे. यामध्ये गुरुवारी त्यांची स्वातंत्र्य यात्राही काढण्यात आली होती. मात्र, यावेळी गोळीबार झाला. त्यात इम्रान खान जखमी झाले होते. या गोळीबारात त्यांच्याशिवाय माजी गव्हर्नर इम्रान इस्माईल हेही जखमी झाले होते.
हेही वाचा - Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी