नवी दिल्ली : निवृत्त IAS अरुण गोयल ( Arun Goel ) यांनी सोमवारी दिल्लीत निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. निवृत्तीच्या 40 दिवस आधी त्यांनी शुक्रवारीच राजीनामा दिला. 31 डिसेंबर 2022 रोजी ते निवृत्त होणार होते. त्यांचा राजीनामा पंजाब आणि केंद्र सरकारने एकाच दिवसात स्वीकारला. ( Arun Goel Took Charge As Election Commissioner Today )
-
Delhi | Arun Goel assumes charge as the new Election Commissioner of India. pic.twitter.com/4c85DsILgt
— ANI (@ANI) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi | Arun Goel assumes charge as the new Election Commissioner of India. pic.twitter.com/4c85DsILgt
— ANI (@ANI) November 21, 2022Delhi | Arun Goel assumes charge as the new Election Commissioner of India. pic.twitter.com/4c85DsILgt
— ANI (@ANI) November 21, 2022
आयोगात एक जागा रिक्त : गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्यासह ते निवडणूक आयोगाचा भाग असतील. मे 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून सुशील चंद्रा यांच्या निवृत्तीनंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होती.
दोन टप्प्यात होणार मतदान : गोयल यांची यापूर्वी अवजड उद्योग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयातही काम केले आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे अशा वेळी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकच्या निवडणुकांचे वेळापत्रक ठरवताना निवडणूक आयोगाकडे तिचे तीनही सदस्य असतील.