लखनऊ Flight delayed By Fog : दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं उत्तर प्रदेशात थंडी आणि धुकं झपाट्यानं वाढत आहे. याचा परिणाम विमानसेवेवर झाला असून खराब हवामानामुळे अनेक विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एटीसीची परवानगी नसल्यानं अनेक विमानांना वळवण्यात आलं आहे. तर अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
कोणती विमानं झाली रद्द : उत्तर भारतात दाट धुकं पसरल्यानं एअर इंडियाचं फ्लाईट क्रमांक एक्स वाय 334 हे रियाधला जाणारं 08.55 वाजताचं विमान त्याच्या नियोजित वेळेऐवजी 11.21 वाजता उड्डाण करणार आहे. लखनऊवरुन इंदूरला जाणारं इंडिगो विमान क्रमांक 6 ई 7439 सकाळी 9:30 वाजताचं विमान नियोजित वेळेअभावी 10:23 वाजता उड्डाण होईल. बंगळुरूला जाणारं एअर इंडियाचं विमान क्रमांक आय 51426 हे 9.45 वाजताचं विमान त्याच्या नियोजित वेळेऐवजी 10:40 वाजता उड्डाण करेल तर इंडिगो कंपनीचं अलाहाबादला जाणारं विमान क्रमांक 6 ई 7935 हे विमान 10:25 च्या नियोजित वेळेऐवजी 11:34 वाजता उड्डाण करणार आहे.
इंडिगो कंपनीचं विमान क्रमांक 6 ई 6281 लखनऊ ते दिल्ली जाणारं 11:00 वाजता जाणारं विमान नियोजित वेळेऐवजी 11:47 वाजता उड्डाण करणार आहे. स्पाईसजेटचं विमान क्रमांक एसजी 9412 लखनऊ ते जोधपूर हे 1.00 वाजताचं विमान त्याच्या नियोजित वेळेऐवजी 2.50 वाजता उड्डाण करेल. इंडिगोचं विमान क्रमांक 6 ई 5241 लखनऊ ते मुंबई विमान 1.50 वाजताऐवजी 3.21 वाजता उड्डाण करेल. एअर इंडियाचं विमान क्रमांक एआय 626 लखनऊ ते मुंबई 2 वाजता सुटणारं विमान नियोजित वेळेऐवजी 3.44 वाजता उड्डाण करेल. लखनऊ ते दिल्ली इंडिगो कंपनीचं विमान 1.50 ऐवजी 3.21 वाजता उड्डाण करेल.
लखनऊवरुन दिल्लीला जाणारं एअर इंडियाचं विमान क्रमांक एआय 432 हे 2.50 वाजताचं विमान त्याच्या नियोजित वेळेऐवजी 4.27 वाजता निघेल. लखनऊ ते पुण्याला जाणारं एअर इंडियाचं विमान क्रमांक आय 5738 02.55 वाजता निघणारं विमान 3.51 वाजता उड्डाण करणार. लखनऊ ते मुंबई फ्लाइट क्रमांक 6 ई 522 हे 4.30 वाजता निघणारं विमान नियोजित वेळेऐवजी 6.39 वाजता उड्डाण करेल. इंडिगो फ्लाइट क्रमांक 6 ई 435 लखनऊ ते बंगळुरू विमान 4.40 वाजताचं विमान 6.27 वाजता उड्डाण करेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.