ETV Bharat / bharat

कर्नाटकात दीड तासात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू; ऑक्सिजन मिळाला नसल्याचा नातेवाईकांचा आरोप - Deputy Commissioner of Police Ramarajan

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत माडिनकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.

श्री भानजी डी खिमजी लाईफलाईन रुग्णालय
श्री भानजी डी खिमजी लाईफलाईन रुग्णालय
author img

By

Published : May 5, 2021, 3:11 PM IST

बंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटकमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना पुन्हा घडली आहे. श्री भानजी डी. खिमजी लाईफलाईन रुग्णालयात मंंगळवारी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.

श्रेयस ध्रुनावत (३२), भालचंद्र दंडागी (६२), विनायक नाईक (४७), वानी व्यंकटेश जैन (५२) अशी ओळख पटलेल्या मृतांची नावे आहेत. एका मृताचे नाव समजू शकलेले नाही.

हेही वाचा-मुलीने वडिलांच्या चितेत घेतली उडी; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून एक ते दीड तासात पाहचही रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी दावा केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत माडिनकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत तज्ज्ञांची समिती तपास करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय चौकशी केल्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल, असे पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रामराजन यांनी सांगितले आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस तैनात केले आहेत.

हेही वाचा-तामिळनाडू : ऑक्सिजनअभावी ११ रुग्ण दगावले; चेंगलपट्टू रुग्णालयातील घटना

यापूर्वी छमराजनगरमधील सरकारी रुग्णालयात 24 कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.