इंफाळ (मणिपूर) : बिहारमध्ये एकीकडे नितीशकुमार यांनी भाजपसोबत राजकीय खेळी करत महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले, तर दुसरीकडे मणिपूरमध्ये जेडीयूलाही मोठा धक्का बसला आहे. त्यांचे 6 पैकी पाच आमदार भाजपमध्ये दाखल (Five JDU MLA Join BJP in Manipur) झाले आहेत. रात्री उशिरा या राजकीय घडामोडीमुळे मणिपूर (Manipur JDU MLA Join BJP) आणि बिहार या दोन्ही ठिकाणी राजकीय उलथापालथ झाली (Nitish Kumar Manipur MLA) आहे. एकीकडे जेडीयू याला असंवैधानिक म्हणत आहे, तर भाजप त्या आमदारांचे खुल्या मनाने स्वागत करत आहे.
या पाच आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश - मणिपूर विधानसभेचे सचिव के मेघजित सिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत पाच JD(U) आमदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण स्वीकारल्याबद्दल सभापतींनी आनंद व्यक्त केला. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत JD(U) ने 38 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 6 जागा जिंकल्या. भाजपमध्ये सामील झालेल्या जेडी(यू) आमदारांमध्ये केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खौटे आणि थंगजाम अरुण कुमार यांचा समावेश आहे.
तिकीट न मिळाल्याने दोघांनी भाजपला केला होता रामराम - खौटे आणि अरुणकुमार यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती, मात्र तिकीट न मिळाल्याने दोघांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. अद्याप या आमदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, परंतु जेडीयूसाठी हा धक्काच नाही तर ईशान्येकडील पकड कमकुवत होण्याची चिन्हे आहेत. खरं तर, काही काळापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूचा एकमेव आमदार भाजपमध्ये दाखल झाला होता. अशा स्थितीत त्या राज्यातून जेडीयूचे प्रतिनिधित्व संपले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.