ETV Bharat / bharat

Bihar Violence : बिहारमध्ये पुन्हा हिंसाचार, नालंदामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू, सासाराममध्ये स्फोट.. इंटरनेट बंद - बिहारमध्ये पुन्हा हिंसाचार

बिहारच्या नालंदामध्ये रात्रभर गोळीबार सुरू होता. परिस्थिती पाहता बिहार शरीफच्या संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पहाडपुरा परिसरात झालेल्या गोळीबारात दोन तरुण गोळी लागली आहे. पोलिस प्रशासन सातत्याने फ्लॅग मार्च काढत आहे. अनेक जिल्ह्यांतील पोलिसांना नालंदा येथे हलवण्यात आले आहे.

Bihar Violence
बिहारमध्ये पुन्हा हिंसाचार
author img

By

Published : Apr 2, 2023, 10:05 AM IST

नालंदा : बिहार शरीफमध्ये शनिवारी रात्री आणि आज सकाळपर्यंत गोळीबार सुरू होता. रात्री झालेल्या गोळीबारात दोन तरुणांना गोळी लागली असून, त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्रभर पोलीस कर्मचाऱ्यांनी फ्लॅग मार्च काढला. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नालंदामधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

3 ठिकाणी रात्रभर गोळीबार सुरू होता : बिहार शरीफ, पहाडपुरा, खासगंज आणि गगंडीवान या 3 ठिकाणी मधूनमधून गोळीबार सुरू होता. एका धार्मिक स्थळाजवळ हल्लेखोर गोळीबार करत राहिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने दगडफेक करण्यात आली. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. अद्याप प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.

बिहार शरीफमध्ये कर्फ्यू : प्रशासनाने संपूर्ण बिहार शरीफमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 5 जिल्ह्यांच्या पोलिसांना नालंदामध्ये पाचारण करण्यात आले आहे. रात्रभर सुरू असलेल्या गोळीबारामुळे बिहार शरीफमधील लोक भयभीत झाले आहेत. सकाळपर्यंत सर्वत्र भीतीचे वातावरण होते. पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागात दंगल नियंत्रण वाहने आणि जवान तैनात केले आहेत. पोलिसांच्या पथकाने रात्रभर संवेदनशील भागात छापे टाकले. पहाडपुरा, खासगंज आणि गगंडीवान परिसरात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. सध्या शनिवारपर्यंत या छाप्यात 27 जणांना अटक केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नालंदाच्या डीएम आणि एसपीवर कारवाईची नोटीस : नालंदाच्या डीएम आणि एसपींना हटवण्याची नोटीस आहे. त्यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नालंदाचे डीएम शशांक शुभंकर आणि एसपी अशोक मिश्रा यांच्या हकालपट्टीला प्रशासकीय विभागाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. प्रशासकीय पातळीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. सासाराममध्येही परिस्थिती वेगळी नाही. तेथे स्फोटही झाला असून त्यात 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा : Thane Crime News: ठाण्यात ६१.२ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोन नायजेरियनसह रिक्षाचालक गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.