लखनऊ : राजधानी लखनऊमधील हजरतगंज महात्मा गांधी रोडवर Hazratganj Mahatma Gandhi Road in Lucknow असलेल्या लेवाना हॉटेलमध्ये fire in hotel levana अचानक आग Fire at Levana Hotel in Lucknow लागली. आगीची माहिती स्थानिक पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या सुमारे 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळते आहे. आतापर्यंत 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Chief Minister Yogi Adityanath यांनी शोक व्यक्त केला आहे.
-
#WATCH | Uttar Pradesh: Fire breaks out at a hotel in Hazratganj in Lucknow. Efforts underway to evacuate the people in the hotel rooms. Details awaited. pic.twitter.com/gxKy6oYyOO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Uttar Pradesh: Fire breaks out at a hotel in Hazratganj in Lucknow. Efforts underway to evacuate the people in the hotel rooms. Details awaited. pic.twitter.com/gxKy6oYyOO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022#WATCH | Uttar Pradesh: Fire breaks out at a hotel in Hazratganj in Lucknow. Efforts underway to evacuate the people in the hotel rooms. Details awaited. pic.twitter.com/gxKy6oYyOO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022
तिसऱ्या मजल्यावर भीषण आग - हजरतगंज महात्मा गांधी मार्गावर असलेल्या लेवाना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली. हॉटेलमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हॉटेल लेव्हानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच लखनौचे डीएम संतोष गंगवार, एडीसीपी सेंट्रल राजेश श्रीवास्तव घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मदत, बचाव कार्य तीव्र करण्यात आले आहे. अनेकांना बेशुद्ध अवस्थेत हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. हॉटेलमध्ये अजूनही अनेक लोक अडकल्याची माहिती मिळते आहे. हॉटेलच्या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.
पाच रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात - तिसऱ्या मजल्यावरील आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेसाठी चार ते पाच रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून तिकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. यादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे, मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतली दखल - लेवाना हॉटेलला लागलेल्या आगीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच जिल्हादंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.