बिहार : राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभेत 'विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१' याबाबत विरोधकांनी केलेल्या गदारोळाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पक्षातील इतर कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभेचे कामकाज कित्येक वेळा स्थगित..
या विधेयकावरुन बिहार विधानसभेमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी सभापतींना त्यांच्या कक्षातून बाहेरही येऊ दिले नाही. या विधेयकामुळे पोलिसांना वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसेच, चौकशीदरम्यान होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढेल असा आरोप विरोधी पक्ष करत होते. या सर्व गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज कित्येक वेळा स्थगित करावे लागले होते.
काळा कायदा लागू करुन सरकार हुकूमशाही आणत आहे..
विधानसभेच्या सभापतींनी कित्येक वेळा या आमदारांना जागेवर बसण्याचे आदेश देऊनही गदारोळ सुरुच राहिला. यावेळी विरोधी पक्षाने या विधेयकाची प्रतही फाडून टाकली. यानंतर तेजस्वी प्रसाद यादव यांनी या विधेयकाला काळा कायदा म्हणत, सरकार हुकूमशाही लागू करत असल्याचा आरोप केला.
हेही वाचा : निकिता तोमर हत्या प्रकरण : आज निकाल जाहीर होण्याची शक्यता