ETV Bharat / bharat

Priyanka Gandhi News: बिग बॉस फेम अर्चनाच्या आरोपानंतर मोठे नाट्य...प्रियंका गांधी यांच्या पीए संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल - संदीप सिंहविरोधात तक्रार

मेरठमध्ये प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना गौतम यांनी संदीप सिंह यांच्यावर गैरवर्तन, धमक्यांसह असभ्य वर्तन असे गंभीर आरोप केले होते.

Priyanka Gandhi News
प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंग यांच्याविरोधात मेरठमध्ये गुन्हा
author img

By

Published : Mar 8, 2023, 6:45 AM IST

मेरठ : रायपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान प्रियंका गांधींचे पीए संदीप सिंह यांच्यावर अर्चना गौतम यांनी धमक्यासह गैरवर्तन आणि असभ्यतेसारखे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अर्चनाच्या वडिलांनी २० फेब्रुवारीला तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी आता प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांच्याविरोधात मंगळवारी परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप सिंहविरोधात तक्रार दाखल : 28 फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते, बिग बॉस स्पर्धक आणि मॉडेल अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी संदीप सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आता तहरीरच्या आधारे संदीप सिंहवर कलम ५०६, ५०९, ५०६ आणि एससी एसटी कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पीए संदीप सिंह यांच्यावर जातीवाचक शब्द वापरून त्यांचा अपमान केला, असा आरोप करत मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे.

मुलीच्या सुरक्षेची मागणी : विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान अर्चना गौतम यांनी संदीप सिंह यांच्यावर अनेक आरोप केले होते. अर्चना सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि म्हणाली की 'संदीप सिंहने तिला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती'. तिने सांगितले की, तिला प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यापासून रोखण्यात आले. यानंतर अर्चना गौतमच्या वडिलांनी सर्व स्तरातून आपल्या मुलीच्या सुरक्षेची मागणी केली. एसपी सिटी पीयूष सिंह यांनी सांगितले की, अभिनेत्री आणि मॉडेल अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध यांच्या तहरीरच्या आधारे संदीप सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना गौतम ही बिग बॉस स्पर्धक आहे.

हेही वाचा : Sanjay Balgude Letter : दादा पुणेकरांना वाचवा; काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.