ETV Bharat / bharat

Father carrying son body on shoulder: अ‍ॅम्ब्युलन्स नाही मिळाली; पित्याने मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून - Father carrying son body on shoulder

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयाने एका गरीब कुटुंबाला मुलाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही (lack of ambulance in prayagraj). त्यानंतर वडील मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन घरी पोहोचले (Father carrying son body on shoulder).

अ‍ॅम्ब्युलन्स अभावी पित्याने मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून

author img

By

Published : Aug 3, 2022, 5:15 PM IST

प्रयागराज: माणुसकीला काळीमा फासणारी घटना येथे समोर आली आहे. येथे मंगळवारी मुसळधार पावसात एक गरीब असहाय बाप मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन रुग्णालयातून घरी पोहोचला (Father carrying son body on shoulder). वडील जखमी मुलाला शहरातील एसआरएन रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. मात्र त्याला वाचवता न आल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गरीब कुटुंबाला मृतदेह नेण्यासाठी रूग्णालयाने रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली नाही (lack of ambulance in prayagraj).

प्रयागराजमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स अभावी पित्याने मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून

रूग्णालयाने रुग्णवाहिकाही दिली नाही - करचना पोलिस स्टेशन परिसरात राहणारा 14 वर्षीय शिवम हा विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला होता. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी एसआरएन रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याला रूग्णालयाने रुग्णवाहिकाही दिली नाही. गरीब कुटुंबाने आपल्या समस्या रुग्णालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या खासगी रुग्णवाहिका चालकांनाही सांगितल्या. मात्र त्यांनी कोणीही मदत केली नाही.

मुलाचा मृतदेह खांद्यावर - यानंतर असहाय्य बाप मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन मुसळधार पावसात रुग्णालयातून पायीच घराकडे निघाला. वडील बजरंगी मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन एसआरएन रुग्णालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन यमुना पुलावर पोहोचले. त्यानंतर खासगी वाहन चालकाच्या मदतीने त्यांनी करचनामधील त्यांचे घर गाठले. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे.

प्रकरणाच्या चौकशीचे आदेश - सध्या प्रयागराज पोलीस आयुक्त विजय विश्वास पंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की ही गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. त्याची चौकशी केली जाईल. तपासात निष्काळजीपणा आढळल्यास आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा - Rape culprit arrested after DNA test: तब्बल 27 वर्षांनी बलात्कार पीडितेला न्याय, डीएनए चाचणीनंतर आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.