ETV Bharat / bharat

Dead Body On Bike : रुग्णालयात मिळाली नाही शववाहिनी, बापाने दुचाकवरूनच नेला चिमुकलीचा मृतदेह! - प्रतापगड वैद्यकीय महाविद्यालय

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड वैद्यकीय महाविद्यालयात शववाहिनी न मिळाल्याने एका बापाने आपल्या मुलीचा मृतदेह दुचाकीवरून नेला. जिल्हा रुग्णालयात 2-2 शववाहिका असूनही त्यांना वेळेवर एकही उपलब्ध झाली नाही. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

Father took daughter body on bike in Pratapgarh
बापाने दुचाकवरून मृतदेह नेला
author img

By

Published : Mar 17, 2023, 11:54 AM IST

दुचाकवरून मृतदेह नेला

प्रतापगड (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशातील वैद्यकीय व्यवस्थेचा हाल अत्यंत दयनीय आहे. आता प्रतापगड जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका वडिलांना आपल्या लहान मुलीचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागला. रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर हे जोडपे बराच वेळ शववाहिनेची वाट पाहत राहिले. मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये मुलीचा मृतदेह घेऊन तिची आई तासनतास रडत होती, परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही. या ह्रदयद्रावक घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.

काय आहे प्रकरण : अंतू पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याणपूर मौरा गावात राहणाऱ्या भीमराव यांच्या ८ महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली होती. मुलीला जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला स्थानिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथून डॉक्टरांनी त्यांना गुरुवारी राजा प्रताप बहादूर रुग्णालयात रेफर केले. येथे उपचारादरम्यान सायंकाळी उशिरा मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रडून आक्रोश केला.

दुचाकीवरून मृतदेह नेला : यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे शव वाहनाची मागणी केली. परंतु प्रशासनाचा लापरवाहीचा कळस एवढा होता की, बराच काळ वाट पाहिल्यानंतरही त्यांना कोणतेच शव वाहन मिळाले नाही. शेवटी असहाय झाल्याने वडिलांनी मुलीचा मृतदेह आपल्या दुचाकीवरून नेला. त्यानंतर आता दुचाकीवरून मृतदेह घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

प्रकरणाची चौकशी होणार : वडील दुचाकीवरून मुलीचा मृतदेह घेऊन जात असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील प्राचार्य डॉ. सलील श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'अशाप्रकारच्या घटनेची कोणतीही माहिती आम्हाला नाही. रुग्णालयात दोन शववाहिन्या आहेत. मात्र तरीही पीडिताला शववाहिनी का मिळाली नाही, याची चौकशी करण्यात येणार आहे'.

हे ही वाचा : Leakage of TSPSC Papers : सुनियोजित रणनीतीने टीएसपीएससीचे पेपर लीक... आरोपीच्या फोनमध्ये 42 अर्धनग्न, नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.