ETV Bharat / bharat

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक

शेतकरी नेते राकेश टिकैत हे गेल्या काही आठवड्यांपासून शेतकऱयांच्या महापंचायतींना संबोधित करत आहेत. आपल्या संबोधनात ते सरकारला आव्हान देताना दिसत आहेत. त्यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Rakesh Tikait
राकेश टिकैत
author img

By

Published : Mar 7, 2021, 7:10 AM IST

Updated : Mar 7, 2021, 7:18 AM IST

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी एका व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलीस नियंत्रण कक्षात आला फोन -

कमला नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन करून राकेश टिकैत यांना गोळी घालून मारणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हा फोन ट्रेस करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास लावला. धमकी देणारा व्यक्ती एक चहा विक्रेता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दारूच्या नशेत केला फोन -

ताब्यात घेतलेल्या चहा विक्रेत्याची कसून चौकशी केली गेली आहे. त्याच्या काही जवळच्या व्यक्तींची देखील चौकशी झाली असून त्याबाबत काहीही संशयास्पद आढळले नाही. त्याने दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षात फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात 11 वेळा चर्चा झाली आहे मात्र, त्यातून कोणाताही मार्ग निघालेला नाही.

Last Updated : Mar 7, 2021, 7:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.