ETV Bharat / bharat

मोदी सरकार देशाचे चौकीदार नसून भांडवलदारांचे रखवालदार - कन्हैया कुमार

सीपीआय नेते आणि जेएनयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी सरकार देशाचे चौकीदार नसून भांडवलदारांचे रखवालदार आहेत, असे ते म्हणाले.

कन्हैया
कन्हैया
author img

By

Published : Feb 12, 2021, 9:20 PM IST

पूर्णिया (बिहार) - सीपीआय नेते आणि जेएनयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी शुक्रवारी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. देशातील अव्वल उद्योगपतींच्या आवश्यकतेनुसार कायदे शेतकऱयांवर लादण्यात येत आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाले.

कन्हैया कुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

नव्याने बनविलेले कायदे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, असे मोदी सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. जर शेतकरी या कायद्याची मागणी करत नाहीत. तर पंतप्रधानांनी हे कायदे का पास केले?, असा सवाल कुमार यांनी केला.

मोदी सरकार देशाचे चौकीदार नसून भांडवलदारांचे रखवालदार आहेत. केंद्र सरकारने रेल्वे, बीएसएनएल, विमानतळ विकले आहेत. आता सरकार मजूर आणि शेतकर्‍यांची लूट करीत आहे, असे ते म्हणाले.हा केवळ शेतकऱ्यांचा लढा नाही. तर सामान्य नागरिकांचा लढा आहे. सरकारविरोधात बोललं की त्यांना दहशतवादी म्हटलं जात. या सरकारला देश फोडायचा आहे. गरीब अधिक गरीब होत आहेत आणि श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. आपण सरकारला कर भरतो, तेव्हा सरकारने मूलभूत सुविधादेखील पुरविल्या पाहिजेत, अशी टीका कन्हैया कुमार यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.