ETV Bharat / bharat

Fake dialysis bills : मयत रुग्णाच्या नावावर वर्षभरापासून बनावट बिले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - मयत रुग्णाच्या नावाखाली डायलिसिससाठी वर्षभरापासून बनावट बिले

एका मयत रुग्णाच्या नावाखाली डायलिसिससाठी वर्षभरापासून बनावट बिले सादर करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील सरकारी जलपाईगुडी रुग्णालयात घडली आहे. ( Fake dialysis bills submitted in the name of deceased patient for a year )

Jalpaiguri Sadar Hospital
मयत रुग्णाच्या नावावर वर्षभरापासून बनावट बिले
author img

By

Published : May 28, 2022, 6:51 PM IST

जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) - एका मयत रुग्णाच्या नावाखाली डायलिसिससाठी वर्षभरापासून बनावट बिले सादर करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील सरकारी जलपाईगुडी रुग्णालयात घडली आहे. ( Fake dialysis bills submitted in the name of deceased patient for a year )

जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुग्ण बहादूर विश्वकर्मा, सुभाष उन्नती पल्ली परिसरातील रहिवासी हा पोलीस अधिकारी होते. त्यांचा मुलगा प्रभात विश्वकर्मा यांनी सांगितले की, बहादूर यांचे 23 जून 2021 रोजी निधन झाले आणि मृत्यू होईपर्यंत ते रुग्णालयात डायलिसिस वर होते.

"माझ्या वडिलांसोबत डायलिसिस करणार्‍या अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हॉस्पिटलचे अधिकारी त्यांच्या नावावर डायलिसिसची बिले जमा करत आहेत. एकाच मशीनचा वापर करून अनेक रुग्णांचे डायलिसिसही केले जात आहे. तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे डायलिसिस उशिरा सुरू होते. सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे. व संबंधितावर कारवाई करावी," अशी प्रतिक्रिया प्रभात यांनी दिली आहे.

ही घटना उघडकीस येताच जिल्हा आरोग्य विभागाने संबंधितावर कारवाई केली. रुग्णालयाचे अधीक्षक चंदन घोष रुग्णाच्या वेशात डायलिसिस युनिटमध्ये गेले आणि अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. हा मुद्दा निदर्शनास आणून दिल्याबद्दल घोष यांनी ईटीव्ही भारतचे आभार मानले. ही बाब आमच्या निदर्शनास येताच डायलिसिस युनिटवर छापा टाकण्यात आला. नर्सिंग सुपरिटेंडंट आणि हॉस्पिटलच्या अधीक्षकांना डायलिसिस युनिटमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे डेप्युटी सीएमओएच ज्योतिष चंद्र दास यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायलिसिस युनिट बॅरकपूर मेडिकेअर अँड रिकव्हरी सेंटर लिमिटेड या खाजगी संस्थेद्वारे चालवले जात होते. रुग्णांना मोफत डायलिसिस उपलब्ध करून दिल्यानंतर बिले राज्य सरकारकडे जमा करण्यात आली होती.

तथापि, या घटनेबद्दल विचारले असता, रुग्णालयाच्या डायलिसिस युनिटचे प्रभारी सौरभ दलुती म्हणाले, "मी सध्या रजेवर असून घरी आलो आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मला फोन करून माहिती विचारली आणि मी त्यांना सर्व माहिती दिली. मी ड्युटीवर असेपर्यंत हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केली आहे. माझ्या अनुपस्थितीत माझ्या नावावर कोणी सही केली हे मला माहीत नाही. माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले गेले आहे."

हेही वाचा - Shahu Chhatrapati : संभाजीराजेंना पाठिंबा पाहिजे होता तर फडणवीसांकडे गेले तसे इतर नेत्यांकडेसुद्धा जाणे गरजेचे होते - शाहू छत्रपती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.