पणजी- राजधानी पणजीत मागील 25 वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होत. मात्र, 2019 ला माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र, मोंसरात पुढे भाजपवासी झाले. जाणून घेऊ पणजी विधानसभा मतदारसंघाची ( Panaji Assembly Elections 2022 )
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. गोव्याची राजधानी पणजी ही राजकीय अस्थिरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. 2014 पासून पणजी हा अस्थिर मतदारसंघ आहे. 1994 पासून 2012 पर्यंत या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परिकर या मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 साली परिकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे निकटवर्तीय सिद्धार्थ कुंकलीकर निवडून विजयी झाले.
हेही वाचा-पणजी : बाबूंश मोंसरात विरुद्ध उत्पल पर्रीकर; : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा
2017 विधानसभा निवडणूक-
2017 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्धार्थ कुंकलीकर यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार यांचा पराभव केला.
हेही वाचा-इंधन दरवाढीवरून निशाणा साधणाऱ्या राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास
2017 ची पोटनिवडणुक
2017 साली राज्यात भाजपला फक्त 13 जागा मिळाल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्डसह दोन अपक्ष आमदार यांनी भाजपला मनोहर परिकर यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा द्यायचे ठरविले होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या मनोहर पर्रिकर यांना आमदार म्हणून निवडून यायचे होते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्यानेच निवडून आलेल्या सिद्धार्थ कुंकलीकर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकर यांचा विजय झाला.
2019 ची पोटनिवडणुक
2019 ला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार बाबुश मोंसरात यांनी भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकलीकर यांचा पराभव केला. मोंसरात यांना या पोटनिवडणुकीत 8786 तर कुंकलीकर यांना 6990 मते मिळाली होती. मात्र 2019 ला बाबुश मोंसरात भाजपवासी झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत ते पणजी मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.
मतदारसंघातील 2022 ची संभाव्य परिस्थिती आणि उमेदवार ( Panaji Assembly election candidates list )
सध्या, भाजपकडून आमदार बाबुश मोंसरात हे प्रबळ उमेदवार आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकरही भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सोबतच काँग्रेसकडून पणजीचे माजी महापौर उदय माडकाईकरही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तर आपकडून वाल्मिकी नायक यांचे नाव आघाडीवर आहे. पणजी मतदारसंघात 22, 203 महिला व पुरुष मतदार आहेत.
पणजीमधील उद्योग ( Industries in Panaji )
पणजी हे राजधानीचे शहर असल्यामुळे सर्वच उद्योग व व्यवस्थापनाची कार्यालये येथे आहेत. त्याशिवाय सर्व सरकारी कार्यालये, पर्यटन क्षेत्रातील हॉटेल उद्योग, कॅसिनो, वाहतूक व्यवसाय, प्रिंटिंग हे या मतदारसंघातील उद्योग आहेत.
मतदारसंघातील समस्या
राजधानीचे शहर असल्याने अनेक उद्योग जगतातील लोक पणजीत येत असतात. मात्र पार्किंग, शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी हे महत्वाचे ( Goa capital Panaji issues ) प्रश्न या मतदारसंघात आहेत. मागच्या वर्षांपासून पणजी साठी 50 करोड चा स्मार्ट सिटीसाठी आलेला निधी अद्यापही खर्च झाला नाही.
पणजी विधानसभा मतदारसंघाच्या ( 2022 Panaji Legislative Assembly election ) निवडणुकीत कोणाची सत्ता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.