ETV Bharat / bharat

लस निर्यातीवरून प्रियंका गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल

देशातील लोकांसाठी पुरेसा साठा न ठेवता लस निर्यात केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारने 70 वर्षांचे प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी
author img

By

Published : Apr 17, 2021, 4:22 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील लोकांसाठी पुरेसा साठा न ठेवता लस निर्यात केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लस निर्यात करणारा देश आता लसीची आयात करत आहेत. सध्याच्या सरकारने 70 वर्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. यूपीमध्ये, गेल्या 10 दिवसांत संक्रमण वेगाने वाढले आहे. आता कोरोनाचा प्रसार खेड्यातही होत आहे. शहरांमध्ये चाचण्यांची कमतरता आहे. आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. लखनऊ, नोएडा, गाझियाबाद, बनारस, अलाहाबाद येथेही चाचणी करण्यासाठी लोक प्रतीक्षेत आहे. जर हा प्रदेश वाचवायचा असेल, तर जास्तीत जास्त आरटीपीसीआर करणे गरजेचे आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

देशातील रुग्णांची परिस्थिती -

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 2,34,692 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय आकडेवारी आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,45,26,609 वर पोहचली आहे. तर गेल्या शुक्रवारी 2,17,353 आणि गुरुवारी 2,00,739 रुग्णांची नोंद झाली होती.

हेही वाचा - बचेंगे तो और लढेंगे! 'आरोग्य हेच धनसंपदा' हे विसरू नका - महेश भागवत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.