हैदराबाद - पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले ( Assembly Election Exit Poll ) आहेत. या एक्सिट पोलमधील अंदाजानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या झंझावातासमोर समाजवादी पक्षाची सायकल पंक्चर झाल्याचे दिसत आहे.
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ चा अंदाज
संस्था | भाजपा | काँग्रेस | आप | एसएडी |
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया | 01-04 | 19-31 | 76-90 | 07-11 |
एबीपी - सी वोटर्स | 07-13 | 22-28 | 51-61 | 20-26 |
चाणक्य | 01 | 10 | 100 | 06 |
पी-मार्क | 01-03 | 23-71 | 62-70 | 16-24 |
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज
संस्था | भाजपा | काँग्रेस | बसपा | सपा | बाकी |
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया | |||||
एबीपी - सी वोटर्स | |||||
पी-मार्क | 240 | 4 | 17 | 140 | 2 |
उत्तराखंड विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज
संस्था | भाजपा | काँग्रेस | आप | बाकी |
इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया | ||||
एबीपी - सी वोटर्स | 26-32 | 32-38 | 00-02 | 03-07 |
पी-मार्क | 35-39 | 28-34 | 00-03 | 00-03 |
मणिपुर विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज
संस्था | भाजपा | काँग्रेस | बाकी |
पी-मार्क | 27-31 | 11-17 | 11-23 |
गोवा विधानसभा निवडणुक २०२२ चा अंदाज
संस्था | भाजपा | काँग्रेस | बाकी |
पी-मार्क | 13-17 | 13-17 | 04-10 |
कसा घेतात एक्झिट पोल?
एक्झिट पोल हा मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशी मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कोणाल मतदान केले, याबाबत विचारले जाते. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती आधीच घेतली गेलेली असते.
कोणत्या संस्था घेतात एक्झिट पोल?
टुडे चाणक्य, एबीपी-सी-व्होटर, न्यूज18, इंडिया टुडे-एक्सिस, टाइम्स नाऊ-सीएनएक्स, न्यूज एक्स-नेता, रिपब्लिक-जन की बात, रिपब्लिक-सी-व्होटर, एबीपी ही माध्यम समुह आणि खाजगी संस्था एक्झिट पोल घेतात.