ETV Bharat / bharat

Breaking News : राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण - undefined

Breaking News
ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Dec 30, 2021, 6:50 AM IST

Updated : Dec 30, 2021, 2:34 PM IST

14:17 December 30

राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

11:59 December 30

कोरोना वाढती रुग्ण संख्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

  • मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली टास्क फोर्स समितीची बैठक
  • बैठकीत राज्यातील एकंदरीत रुग्ण संख्येचा घेतला जाणार आढावा

10:07 December 30

उभ्या ट्रॅक्टरल छोट्या पिकअपची धडक, अपघातात सहा जणांचा मृत्यू

  • सिल्लोड (औरंगाबाद) - रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पीकअपची धडक
  • टॅक्टर - पीकअप अपघातात सहा जणांचा मृत्यू
  • सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर मोढा फाटा, भराडी रोड या ठिकाणी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते
  • बुधवारी मध्यरात्रीनंतर 2.00 वाजताचे सुमारास अशोक लेलँड छोटा पीकअप (MH 20 CT 2981) असे प्रवाशी घेऊन येत असताना ऊसाचे ट्रॅक्टरला धडक
  • अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, मृत्यूमुखी पडलेले सर्व मंगरूळ ता. सिल्लोड येथील रहिवासी
  • जखमींवर सिल्लोड येथील रुग्णालयात उपचार सुरु

09:34 December 30

प्रक्षोभक भाषण प्रकरणी कालीचरण महाराज यांना मध्यप्रदेशात अटक

  • रायपूर - महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांना अटक
  • छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे
  • छत्तीसगडमध्ये झालेल्या 'धर्म संसद'मध्ये कालीचरण यांनी महात्मा गांधींचा अवमान करणारे प्रक्षोभक भाषण केले होते
  • कालीचरण यांना प्रक्षोभक भाषणासाठी अटक करण्यात आली आहे
  • त्याच्याविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

09:16 December 30

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत जमावबंदीचा आदेश, 7 जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू

  • मुंबई - कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत जमावबंदीचा आदेश
  • मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी
  • कोरोना, ओमोक्रॉन रुग्ण वाढल्याने मुंबईत जमावबंदीचा निर्णय
  • मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू
  • सर्व प्रकारचे कार्यक्रम आणि मेळाव्यांवर बंदी
  • मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा निर्णय घेतला आहे

06:42 December 30

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज 30 डिसेंबरला या जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक लढत तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. 31 डिसेंबरला या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत.

Last Updated : Dec 30, 2021, 2:34 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

big breaking
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.