ETV Bharat / bharat

Bamboo Socks In Kolhapur : कोल्हापूरमध्ये 'बांबूपासून सॉक्स'! पहा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

author img

By

Published : Apr 6, 2022, 12:24 PM IST

बांबूपासून सॉक्स बनवले जातात असे सांगितले तर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. पण हो... हे खरे आहे. कोल्हापूरातील एका उद्योजकाने बांबूपासून सॉक्स बनवण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे. (Bamboo Socks In Kolhapur) बघता-बघता त्यांच्या या सॉक्सला प्रचंड मागणी वाढली आहे. कोण आहेत हे उद्योजक? काय आहे संकल्पना? कसे तयार होतात सॉक्स? वाचा याबाबतचा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला आढावा-

बांबूपासून बनवलेले सॉक्स
बांबूपासून बनवलेले सॉक्स

कोल्हापूर - नुकताच गुढीपाडवा झाला, यासाठी गुढी म्हणून जो बांबू सर्वांनी आपल्या घरात आणला होता. त्याच बांबूपासून सॉक्स बनवले जातात असे सांगितले तर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. पण हो... हे खरे आहे. कोल्हापूरातील एका उद्योजकाने बांबूपासून सॉक्स बनवण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे. बघता-बघता त्यांच्या या सॉक्सला प्रचंड मागणी वाढली आहे. (Socks are being Made from bamboo ) कोण आहेत हे उद्योजक? काय आहे संकल्पना? कसे तयार होतात सॉक्स? वाचा याबाबतचा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला आढावा-

बांबूपासून सॉक्स बनवले. त्याबाबत माहिती देताना व्यावसायीक

परदेशात असताना संकल्पना सुचली - कोल्हापूरात राहणारे नविनकुमार माळी गेल्या काही वर्षांपासून वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करतात. पूर्वी ते एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होते. (Bamboo Socks In Kolhapur) नोकरी सोडून त्यांनी गोकुळ शिरगाव येथे त्यांचा बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र, कामानिमित्त परदेशी दौऱ्यावर गेले असता तैवानमध्ये त्यांना बांबू सॉक्स बाबत माहिती मिळाली. त्यामुळे याच संकल्पनेनुसार आपणही कोल्हापूरात हा व्यवसाय सुरू करू शकतो म्हणत त्यांनी कोल्हापूरातल्या इचलकरंजी येथे हा व्यवसाय सुरू केला आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या या व्यवसायाने आता चांगलाच वेग घेतला आहे. यांनी या सॉक्सला 'बांबू बी प्लस' असे नाव दिले आहे.

कोल्हापूरमध्ये बांबूपासून सॉक्स बनवले जात आहेत

असा तयार करतात बांबू सॉक्स - माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बांबूवर प्रक्रिया करून त्याला क्रश केले जाते. त्या क्रश पासूनच एक धागा बनवला जातो. नंतर धाग्याला विविध रंगही दिले जातात. हे धागे पुढे यान म्हणजेच एका मोठ्या गुंडीमध्ये एकत्र करून पुढे याच धाग्यांपासून सॉक्सचे विणकाम सुरू होते. त्यासाठी तामिळनाडूमधील एका व्यावसायिकाकडून हे धागे बनवून घेतो. नंतर ते इचलकरंजी येथील कारखान्यात विणण्याचे पूढील काम सुरू होते. यासाठी त्यांनी तैवानहून अत्याधुनिक यंत्र आणले असून त्यासाठी जास्त कामगारही सुद्धा लागत नाहीत. गेल्या 2 वर्षांपासून ते हा व्यवसाय करत असून त्यांच्या या सॉक्सला प्रचंड मागणी असल्याचेही ते सांगतात.

बांबू सॉक्सचे फायदे - बांबू सॉक्सचे प्रचंड फायदे असल्याचे व्यावसायिक नविनकुमार माळी सांगतात. इतर सॉक्सच्या तुलनेत बांबू सॉक्सची गुणवत्ता जास्त चांगली आहे. या सॉक्सचा नेहमी वापर केला तर पायाचे आरोग्यसुद्धा वाढते. कोणत्याही पद्धतीने इन्फेक्शन होऊ नये यासाठी सुद्धा यकजा वापर अतिशय चांगला ठरू शकतो. या सॉक्समुळे त्वचा कोरडी तसेच थंड राहायला मोठी मदत होते. इतर सॉक्सच्या तुलनेत हे अतिशय मऊदार आहेत. एकच सॉक्स 5 दिवस घातला तरी त्याचा कोणत्याही पद्धतीने घाण वास येत नाही याचा सुद्धा माळी यांनी विश्वास दिला आहे.

सॉक्सची किंमत कमी सुद्धा करू शकतो - आपल्याकडे केवळ प्रीमियम दर्जाचे सॉक्स बनवले जात असून आमच्या वेबसाईटवर तसेच पुणे आणि कोल्हापूरातसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय ज्या ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन तसेच इतर व्यावसायिकांचे प्रदर्शन असते. त्याठिकाणी आम्ही हे विक्री करतो असेही ते सांगतात. अनेकांनी आपल्याकडून सॉक्स घेतले असून, पुन्हा-पुन्हा ऑर्डर येत आहेत. या सॉक्सची किंमत मात्र 200 ते 300 रुपयांपर्यंत असून त्या किंमतीप्रमाणे याची गुणवत्ता सुद्धा आहे. मात्र, सध्या मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू नाही. जर मोठ्या पातळीवर हा व्यवसाय गेला तर विविध अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून या सॉक्सची किंमत कमी सुद्धा करू शकतो असेही माळी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे माजी प्रमुख आकार पटेल यांना देश सोडण्यापासून रोखले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.