आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -
आर्यन खान आज तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता
मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान प्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत आज येणार असल्याने आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. गेल्या २६ दिवसांपासून आर्यन खान तुरुंगात आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची एनसीबीने दक्षता पथकाकडून आजपासून चौकशी -
मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता पथकाकडून आजपासून चौकशी होणार आहे. दक्षता पथकाने बुधवारी समीर वानखेडे यांची चार तास चौकशी केली. एजन्सीने साईललाही चौकशीसाठी बोलावले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने अलीकडेच दावा केला होता की एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी क्रूझ जहाजावरील छापा प्रकरणातील आरोपी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. या आरोपानंतर एनसीबीने दक्षता पथकाची स्थापना केली आहे.
समीर वानखेडेंच्या समर्थनात भाजपचे आज मुंबईत आंदोलन
मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तर त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे. भाजप आज मुंबईत निदर्शने करणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शने होणार आहेत.
समीर वानखेडे प्रकरणात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद -
मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे.. आजपासून लाल परी नियमित धावणार
मुंबई - गेले अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारने मानल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे आजपासून एसटीच्या फेऱ्या नियमित होणार आहेत.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -
अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल
चेन्नई - रजनीकांत यांना गुरूवारी त्यांच्या शरीराच्या नियमित तपासणीसाठी चेन्नईच्या अलवरपेट येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील २४ तास ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील.
सविस्तर वाचा - अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल
गोव्यात ममता बॅनर्जींचे आगमन; हिंदू संघटनांनी दाखवले काळे झेंडे
सिंधुदुर्ग - तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे आज संध्याकाळी गोव्यात आगमन झाले. यावेळी भाजपा कार्यकर्ते व हिंदू संघटनांनी त्याना काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जी परत जा चा नारा दिला आहे.
सविस्तार वाचा - गोव्यात ममता बॅनर्जींचे आगमन; हिंदू संघटनांनी दाखवले काळे झेंडे
यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत - विजय वडेट्टीवार
मुंबई - राज्यात वर्ष २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता जुलैमध्ये ३६५ कोटी ६७ लाख व ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये ४ हजार ८६४ कोटी असे एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा - यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत - विजय वडेट्टीवार
समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू आहे वाद, जाणून घ्या, कागदपत्रात छेडछाड केल्यास काय होते कारवाई
मुंबई - एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरुन वादंग निर्माण झाला आहे. शिक्षण किंवा नोकरीसाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, त्यात छेडछाड केल्याचे उघड झाल्यास अथवा जात प्रमाणपत्र समितीने रद्द ठरविल्यास कारवाई होते. संबंधिताच्या नोकरीवर गदा, फौजदारी गुन्हा आणि दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे मत अल्पसंख्यांक समितीच्या सदस्यांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केले.
वाचा सविस्तर - समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू आहे वाद, जाणून घ्या, कागदपत्रात छेडछाड केल्यास काय होते कारवाई
तूर्तास मुंबई पोलिसांकडून कारवाई होणार नाही, हायकोर्टाचा वानखेडेंना दिलासा
मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
वाचा सविस्तर -तूर्तास मुंबई पोलिसांकडून कारवाई होणार नाही, हायकोर्टाचा वानखेडेंना दिलासा
29 ऑक्टोबर राशीभविष्य : कर्क राशीवाल्यांना आज आर्थिक लाभ मिळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य