ETV Bharat / bharat

Budgam Encounter : सुरक्षा दलाला मोठे यश! बडगाममधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - बडगाम चकमक

मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूराच्या झालोवा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ( Three militants killed in Budgam ) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे

Budgam
बडगाम
author img

By

Published : Jan 7, 2022, 10:42 AM IST

बडगाम - काश्मीर खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूराच्या झालोवा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ( Three militants killed in Budgam ) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे

Encounter Update: Three militants killed in Budgam J&K
काश्मीर पोलिसांचे टि्वट...

दहशतवाद्यांच्या ठिकाणावरून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. शोध मोहीमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले. या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे.

काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहिम सुरू केली आहे.

हेही वाचा - South Kashmir Encounter : लष्कराची मोहीम फत्ते! तीन दशतवाद्यांचा खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.