श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे.
वैलू आणि कोकेरनाग भागामध्ये लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यावेळी या गोळीबाराला प्रत्युत्तर देत जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातला होता. यानंतर सुमारे तीन ते चार तासांच्या मेहनतीनंतर तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले.
जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली. या परिसरामध्ये चकमक थांबली असली, तरी शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 5जी मुळे होत नाही कोरोनाचा प्रसार; केंद्राचे स्पष्टीकरण