ETV Bharat / bharat

Twitter Offices Closed In India : एलन मस्कने भारतातील तीनपैकी दोन ट्विटरचे कार्यालय गुंडाळले, जाणून घ्या काय आहे कारण - पराग अग्रवाल

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता ट्विटरने देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कार्यालय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना ट्विटरने वर्क फ्रॉम होम काम करण्याचे आदेश दिले आहेत.

Twitter Offices Closed In India
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 17, 2023, 1:27 PM IST

नवी दिल्ली : जगभरात मंदीचे सावट घोंगावत असताना ट्विटरनेही भारतातील आपले दोन कार्यलय गुंडाळले आहेत. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. एलन मस्क यांनी 2023 च्या शेवटच्या महिन्यापर्यंत ट्विटरला वित्तिय स्थिरता देण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यामुळे ट्विटर कार्यालयाचे भाडे देण्यास एलन मस्क असमर्थ ठरत असल्याचे मिम्स सध्या व्हायरल होत आहेत.

200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ : ट्विटरला एलन मस्क यांनी विकत घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. त्यातच एलन मस्क यांनी भारतीय वंशाचे नागरिक तथा ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर एलन मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देत ट्विटरला आर्थिक स्थिरता देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. मात्र यामुळे ट्विटरवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ट्विटरने विदेशातीलही अनेक कर्मचारी कमी केले आहेत. त्याबाबतची प्रकिया अद्यापही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई दिल्लीतील कार्यालयाला टाळे : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्लीतील कार्यालयाला टाळे लावण्याची घोषणा केली आहे. या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही बंगळुरू येथील कार्यालया सुरू ठेवण्यात आले आहे. बंगळुरूच्या कार्यालयात बहुतांश अभियंते कार्यरत आहेत. हे अभियंते तिथेच कार्यरत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतात इतके युझर : सोशल माध्यमावर तरुणाई सतत काही ना काही अपडेट टाकत असते. त्यातही ट्विटर हे तरुणाईच्या सगळ्यात आवडते सोशल माध्यम प्लॅफॉर्म आहे. भारतातील अनेक राजकीय पुढारी ट्विटरचा वापर करतात. त्यांचे ट्विटरवर अनेक मिलियन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 86.5 दशलक्ष फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. एलन मस्कच्या या नव्या धोरणानुसार ते मार्केटला कमी महत्व देत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे एलन मस्कने $44 बिलियनला खरेदी केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. दुसरीकडे सॅन फ्रॅन्सिस्को आणि लंडन येथील कार्यालयाचे भाडे भरण्साठीही मोठी कसरत करावी लागल्याची चर्चा सध्या करण्यात येत आहे.

हेही वाचा - Diesel And Gas Vehicles Ban In EU : युरोपीयन संसदेच्या वाहनबंदीच्या निर्णयावर इटलीतील मंत्री अधिकाऱ्यांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.