ETV Bharat / bharat

ED Raid :   राष्ट्रवादीच्या माजी खजिनदारावर ईडीची मोठी कारवाई! 315 कोटींच्या 70 मालमत्तेवर टाच - सिल्लोड

ED Raid : ईडीकडून राज्यभरात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष आणि माजी राज्यसभा सदस्य ईश्वरलाल शंकरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांच्या विरोधात ईडीनं आज कारवाई केली.

ED Raid
राष्ट्रवादीच्या माजी खजिनदारावर ईडीची मोठी कारवाई! 315 कोटींच्या 70 मालमत्तेवर टाच
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 12:56 PM IST

Updated : Oct 15, 2023, 1:11 PM IST

नवी दिल्ली ED Raid : राज्यभरात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईत 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी रुपये आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्त करण्यात आलीये. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ईडीकडून सातत्याने राज्यात कारवाया सुरू असतात. राजमल लखीचंद यांच्या 315.6 कोटी रुपयांच्या 70 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीनं जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

बनावट आर्थिक विवरणपत्रे दिल्याचा आरोप- सीबीआयकडं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, राजमल लखीचंद ज्वेलर्सने बँकेचे 206.73 कोटी रुपयांचे, आरएल गोल्डने 69.19 कोटी रुपयांचे आणि मनराज ज्वेलर्सने 76.57 कोटी रुपयांचे नुकसान केलंय. कथित आरोपी प्रवर्तकांनी त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जासाठी बँकेकडं गहाण ठेवलेल्या मालमत्ता विकल्याचा आरोप आहे. आरोपींनी बँकेच्या पत सुविधांचा गैरवापर केला. त्यानंतर पैसे कर्ज घेताना सांगितलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरले. त्यामुळं आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवर्तकांनी अशी कर्जे मिळवण्यासाठी बनावट आर्थिक विवरणपत्रे सादर केली होती, असं ईडीनं म्हटलंय.

यापूर्वी टाकले होते छापे- यापूर्वी, ईडीनं जळगाव, नाशिक आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद ग्रुपच्या 13 मालमत्तांवर छापे टाकले होते. छापेमारीवेळी विविध कागदपत्रे, 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्याचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन व माजी आमदार मनीष जैन यांचा या प्रकरणात समावेश असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On Hasan Mushrif : ईडी कारवाईत पत्नीनं धाडस दाखवलं, मात्र...; शरद पवार मुश्रीफांवर बरसले
  2. ED Probe Sangli : तब्बल 53 तासानंतर 'त्या' खात्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीच्या रडारवर कोण ?
  3. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?

Last Updated : Oct 15, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.