श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ( Farooq Abdullah money laundering case ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ फारूख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल ( ED files chargesheet against Farooq Abdullah )केले. एजन्सीने जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ अब्दुल्ला यांची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ही घटना घडली आहे.
निवडणुकीशी संबंध : डॉ. फारुक यावर्षी 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्रीनगरच्या राजबाग येथील ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी ईडीने केलेल्या चौकशीचा संबंध जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडला होता.
बोलण्यास दिला नकार : "मी (समन्सबद्दल) जास्त काही बोलणार नाही... निवडणुका होणार आहेत आणि तोपर्यंत ते आम्हाला त्रास देतील," ते म्हणाले. सुमारे साडेतीन तास चौकशी करून कार्यालयातून बाहेर पडताना ते मात्र निवांत दिसले, मात्र बाहेर थांबलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देण्यास नकार दिला.
आधीही नोंदविला आहे जबाब : याआधी 27 मे रोजी ईडीने डॉ. फारुख यांना या प्रकरणासंदर्भात त्यांच्या श्रीनगर कार्यालयात बोलावले होते. अधिका-यांनी सांगितले होते की, 84 वर्षीय माजी जम्मू आणि काश्मीर राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले 2019 मध्ये याच प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला होता. डॉ. फारूक हे 2001 ते 2012 या काळात JKCA चे अध्यक्ष होते आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि ED द्वारे 2004 ते 2009 दरम्यान झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित घोटाळ्याची चौकशी केली जात होती.
हेही वाचा : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा - उमर अब्दुल्ला