कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केल्यानंतर आता भाजपा नेता सुवेंदू अधिकारी यांनाही भाषणासंदर्भात चेतावणी दिली आहे. तसेच कूच बिहार घटनेवरील विधानावरून बंगाल भाजपा प्रमुख दिलीप घोष यांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याचबरोबर भाजपा नेता राहुल सिन्हावर निवडणूक आयोगाने 48 तासांसाठी प्रचार बंदी लावली आहे.
बंगाल भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी कूच बिहार घटनेवर भाष्य केले होते. कूच बिहारच्या सितलकूचीमध्ये मरण पावलेल्या तरुणांप्रमाणे पुन्हा कोणी कायदा हातात घेण्याच प्रयत्न केला. तर पुन्हा हत्या होतील, असे ते म्हणाले होते. तर भाजपा नेते राहुल सिन्हाने सोमवारी केंद्रीय दलाच्या जवानांना योग्य वाटल्यास ते मतदानादरम्यान बाधा निर्माण करणाऱयावर गोळीबार करू शकतात, असे म्हटलं होतं. तसेच ममता बॅनर्जी यांच्या गुंडावर गोळीबार करून केंद्रीय दलाच्या जवानांनी योग्य काम केले, असेही ते माध्यामांशी बोलताना म्हणाले.
जातीयवादी वक्तव्ये आणि केंद्रीय सुरक्षा दलांविरोधी वक्तव्ये केल्यामुळे निवडणूक आयोगाने ममतांवर कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी त्यांच्यावर २४ तासांसाठी प्रचार करण्याची बंदी लागू केली होती. या आदेशाविरोधात ममता बॅनर्जी आंदोलन करत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
हेही वाचा - शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!