ETV Bharat / bharat

Railway Underpass Construction Collapsed : काम सुरु असलेला रेल्वे अंडरपास कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून चार मजूर ठार - रेल्वे अंडरपास बांधकाम कोसळले

धनबाद रेल्वे विभागाच्या प्रधानखांता ( Dhanbad Railway Division ) स्थानकाजवळ अंडरपास कोसळल्याने ( Railway Underpass Construction Collapsed ) 6 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार मजुरांचा मृत्यू झाला ( Underpass Collapsed Four Workers Died ) आहे.

Railway Underpass Construction Collapsed
काम सुरु असलेला रेल्वे अंडरपास कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून चार मजूर ठार
author img

By

Published : Jul 13, 2022, 9:41 AM IST

Updated : Jul 13, 2022, 12:03 PM IST

धनबाद ( झारखंड ) : धनबाद रेल्वे विभागातील प्रधानखंता ( Dhanbad Railway Division ) स्थानकाजवळ छटाकुली गावाजवळील अंडरपास कोसळल्याने ( Railway Underpass Construction Collapsed ) ढिगाऱ्याखाली दबून ४ मजुरांचा मृत्यू झाला ( Underpass Collapsed Four Workers Died ) आहे. त्याचवेळी दोन मजूर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच डीआरएम आशिष बन्सल, सहाय्यक कमांडंट आरपीएफ आणि जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी टीम फोर्ससह घटनास्थळी पोहोचले, असून बचावकार्य पूर्ण झाले आहे. सर्व मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतला घटनेचा आढावा

कसा घडला अपघात : ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री अंडरपासचे बांधकाम सुरू होते. दरम्यान, रेल्वे रुळावरून एक मालगाडी गेली. त्यानंतर अचानक माती खचली. गावकऱ्यांनी सांगितले की, मजूर रेल्वे रुळाखाली 10 फूट खाली काम करत होते. अंडरपास कोसळल्याने ढिगाऱ्याखाली 6 मजूर गाडले गेले. घटनेनंतर गावकऱ्यांच्या मदतीने 2 मजुरांना बाहेर काढण्यात आले मात्र 4 अजूनही मातीत गाडले गेले होते. या चारही मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची पुष्टी होताच ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी नुकसान भरपाईची मागणी सुरू केली.

घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

मदत आणि बचाव कार्य सुरू : अपघातानंतर डीआरएमच्या सूचनेनुसार बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. वरिष्ठ डीसीएम अखिलेश पांडे यांनी सांगितले की, या घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही. तपास पथक स्थापन करण्यात आले असून, ते या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि जखमी मजुरांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असे ते म्हणाले.

ठार झालेल्या मजुरांची नावे: मिळालेल्या माहितीनुसार, मातीत गाडलेल्या मजुरांमध्ये निरंजन महातो, पप्पू कुमार महतो, विक्रम कुमार महतो आणि सौरभ कुमार धिवार यांचा समावेश आहे. या चारही मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीवरून बलियापूर पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री दहा वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांना पाहता तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली. यानंतर पोलीस प्रशासन मदतकार्यात गुंतले.

हेही वाचा : Betul Railway Station: रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिला पडली; व्डिडीओ व्हायरल

Last Updated : Jul 13, 2022, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.