ठाणे भिवंडीतील गोदाम भाडे तत्त्वावर घेतलेल्या पाच गोदामांमधून औषध विभागाच्या पथकाने छापा drug department raid on Bhivandi Godown टाकून कालबाह्य झालेल्या ६० लाख रुपयांचा औषधांचा साठा जप्त Drug department seized expired medicine stock केला आहे. औषध निरीक्षक आबासाहेब आनंदराव रासकर यांच्या तक्रारीवरून गोदाम मालक ओमप्रकाश बलबीराम रुगरारा राहणार मिरारोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७४ तसेच औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नियम १९४५ च्या कलम २७४ अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station गुन्हा दाखल केला आहे. Drug department action against medicine godown honor
कालबाह्य औषधांचे पावडर बनवून करणार होते विक्री मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत अरिहंत कंपाऊंडमधील संकुल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओमप्रकाश बलबीराम रुहरारा यांनी परवानगीशिवाय गोदामांमध्ये मुदतबाह्य वेगवेगळ्या कंपन्यांचा औषधांचा मोठा साठा केला होता. कालबाह्य झालेली ही औषधे नष्ट करण्याऐवजी त्याची पाउडर बनवून औषधे बनवून विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र घटनेची माहिती पोलीस आणि औषध विभागाला मिळताच पोलिसांनी पाचही गोदामावर छापा टाकून सील केली आहेत. या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील करीत आहेत.