गुवाहाटी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाम विधानसभा निवडणुकीसाठीसाठी प्रचार सभा सुरू केल्या आहेत. पीएम मोदींनी आसाममधील बोकाखाटमध्ये एका जनसभेला संबोधित करताना म्हटले की, येथील लोकांनी भाजपला दुसऱ्यांदा सत्ता देण्याचा निश्चय केला आहे. आसाममध्ये दुसऱ्यांदा 'डबल इंजिन' सरकार बनणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
पीएम मोदींनी म्हटले की, केंद्रात NDA ची सरकार आहे व राज्यातही NDA ची सरकार आहे. त्यामुळे डबल इंजिनची ताकद आसामला गतीने विकासाकडे घेऊन जात आहे. आता महामार्ग निर्माणाचे काम दुप्पट ताकदीने होत आहे. कारण आसामला देशाशी जोडले जात आहे.
मागील पाच वर्षातील भाजपच्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, आसाम दर्शनच्या माध्यमातून 9,000 हून अधिक स्थानावरील सोयीसुविधा वाढवल्या आहेत.
काँग्रेसला केवळ सत्ता पाहिजे - मोदी
काँग्रेसवर निशाना साधताना पीएम मोदींनी म्हटले की, भाजपच्या नेतृत्वात NDA सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र घेऊन पुढे जात आहे. परंतु आजच्या काँग्रेस नेत्यांना केवळ सत्ता पाहिजे. मग ती कशीही मिळो. सध्या काँग्रेसचा खजाना रिकाना झाला आहे. त्याला भरण्यासाठी त्यांनी कोणत्याही किमतीत सत्ता पाहिजे.
आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे व २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.